District Bank Election : माघारीनंतर आज होणार चित्र स्पष्ट; सत्ताधारी समता पॅनलचे उमेदवार जाहीर

election news
election newsesakal
Updated on

Nashik News : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुक प्रक्रीयेत मंगळवारी (ता. २०) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सत्ताधारी समता पॅनलने सोमवारी (ता. १९) उशिरा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

बँकच्या २१ जागांसाठी निवडणूक होत असून, एकूण १६० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या ५ जूनला निवडणुक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यात केवळ तीन अर्ज बाद ठरले होते. (District Bank Election After retreat result will be clear today Candidate of Ruling Party Panel announced Nashik News)

तर, सर्वसाधारण गटात ५७, तालुका प्रतिनिधी गट- ३०, महिला राखीव, इतर मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती-जमाती गटांसाठी प्रत्येकी आठ, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील ११ उमेदवारांचा यात समावेश आहे.

अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपत आहे. या मुदतीत कोणत्याही प्रमुख उमेदवाराने माघार घेतलेली नाही. माघारीनंतर बुधवारी (ता. २१) अंतिम यादी प्रसिद्धी व त्यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. २ जुलैला सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे.

समता पॅनलचे उमेदवार

सत्ताधारी समता पॅनलने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. पॅनलचे प्रणेते रमेश राख, भाऊसाहेब खातळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत २१ उमेदवारांची घोषणा केली. १९९६पासून बॅंकेवर समता पॅनलची सत्ता असून, पॅनलने बॅंकेच्या हितासाठी काम केल्याचा दावा खातळे यांनी केला. दरम्यान, पॅनलने सहा संचालकांना पुन्हा संधी दिली असून, १५ नवीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

election news
Nashik News : इगतपूरी तहसिल कार्यालयात विविध दाखल्यांसाठी पिळवणूक; Agentशिवाय पर्याय नाही

जाहीर झालेले उमेदवार असे : सुधीर पगार, विजयकुमार हळदे, दीपक आहिरे, प्रविण भाबड, प्रशांत गोवर्धने, प्रशांत कवडे, विजय खातळे, शशीकांत वाघ, सुरेश चौधरी, राजे निकुंभ, सतीश भोरकडे, मिर्झा गफुर बेग इसा बेग, गणेश वाघ, अमित आडके, प्रतिश सरोदे, संदीप दराडे, हेमंत देवरे, अमित पाटील, प्रदीप अहिरे, मंगला ठाकरे, सरिता पानसरे.

सहकार पॅनलची आज घोषणा

विरोधी सहकार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी केली जाणार असल्याचे पॅनलचे नेते रवींद्र आंधळे व प्रमोद निरगुडे यांनी सांगितले. सहकार पॅनलकडे इच्छुकांचा ओढा अधिक असल्याने उमेदवारी निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे.

सर्वसमावेशक उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याचे आंधळे यांनी स्पष्ट केले. पॅनलतर्फे रविंद्र आंधळे, विक्रम पिंगळे, प्रमोद निरगुडे, अजित आव्हाड, मोठाभाऊ ठाकरे, विजय देवरे, सचिन विंचुरकर, मंदाकिनी पवार, भरत राठोड, सुनील गिते, जयंत शिंदे, निलेश देशमुख, ज्ञानेश्‍वर माळोदे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे.

election news
Nashik Railway Update : इगतपुरीत आता 17 Express गाड्यांना थांबा; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ट्विट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.