Nashik News : जिल्ह्याला खरीप हंगामासाठी सव्वादोन लाख टन आवटंन मंजूर

allocation
allocation esakal
Updated on

Nashik News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच रासायनिक खत खरेदीची तयारी सुरू केली. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ४३ लाख ३१ हजार ५०० टन खतांचे आवटंन मंजूर केले आहे.

यात नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख २२ हजार ८६० मेट्रीक टन खतांचा समावेश आहे. हा खत साठा एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल. (district been approved for allocation of 2 million tonnes for Kharif season Nashik News)

रब्बी हंगाम संपुष्टात आल्यानंतर, खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. पुणे येथील कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी रासायनिक खताचा कोटा नुकताच मंजूर केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारच्या वतीने खत परिषदेचे विभागीय आयोजन करण्यात येते.

खरीप आणि रब्बी हंगामात विविध राज्यांकडून मागील वर्षी रासायनिक खतांची मागणी यापैकी शेतकऱ्यांनी वापरलेले खत आणि उपलब्ध शिल्लक खत साठा याचा विचार करून खरीप हंगामासाठी खताचा कोटा मंजूर करण्यात येतो.

यानुसार चालू वर्षातील खरीप हंगामासाठी राज्याला ४३ लाख १३ हजार ५०० टन खताचा साठा मंजूर करण्यात आला आहे. यात युरिया १३ लाख ७३ हजार ५०० टन , डीएपी ४ लाख ५० हजार टन, एमओपी १ लाख ९० हजार टन, संयुक्त खते १५ लाख ५० हजार टन आणि एसएसपी ७ लाख ५० हजार टन खतांचा समावेश आहे.

१७ लाख द्रव बॉटल युरियाही उपलब्ध

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनचा वापर करतात. या ठिबक सिंचनाच्या पाण्यासोबत द्रव स्वरूपातील युरिया मिसळला तर पिकांना लाभ होतो, हे निदर्शनास आल्याने केंद्र शासनाने यावर्षी द्रव स्वरूपातील युरियाच्या १७ लाख बॉटल महाराष्ट्रासाठी उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना द्रव युरिया बॉटलचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

allocation
Shiv Sena Shinde Group : भाऊसाहेब चौधरींकडे संघटनात्मक जबाबदारी

नाशिक विभागासाठी मंजूर खत आवटंन असे

उपलब्ध होणाऱ्या खताचा आवटंन विचारात घेऊन राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याचा खताचा वापर विचारात घेऊन सर्व प्रकारच्या खतांचे आवटंन प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख २२ हजार ८६० टन, नंदुरबार जिल्ह्यासाठी ८७ हजार ९९० टन,

जळगाव जिल्ह्यासाठी ३ लाख ५ हजार १४० टन, अहमदनगरसाठी २ लाख १६ हजार ५१० तर, धुळ्यासाठी ९४ हजार ३८० टन खत साठा मंजूर झाला आहे. मंजूर करण्यात आलेला खताचा कोटा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत दरमहा प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येणार आहे.

"राज्याच्या कृषी आयुक्तांनी नुकतेच प्रत्येक जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता रासायनिक खताच आवटंन मंजूर केला आहे. यानुसार नाशिक कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख २२ हजार ८६० मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. या महिन्यापासून खत उपलब्ध देखील होण्यास सुरवात झाली आहे."

- अभिजित जमदाडे, मोहीम अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद

allocation
Nashik Committee Election : महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.