नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्चमध्ये होत असलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध पथकांची नजर असणार आहे.
जिल्ह्यात प्रभावीपणे कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सूचना दिल्या आहेत. (District Collector Gangatharan D on SSC HSC Exam Copy free examination campaign will implemented nashik news)
दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीविरहीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न इतर विभागांकडून संनियंत्रण करण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्रांची अतिसंवेदनशील, संवेदनशील, उपद्रवी व सर्वसाधारण अशी वर्गवारी केलेली असून, कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी हे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर आकस्मिकपणे भेटी देतील.
परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून एकाच शाळेचे अथवा संस्थेचे सर्व शिक्षक त्याच परीक्षा केंद्रावर न नेमता, मुळ शाळेचे काही शिक्षक व इतर शाळांचे काही शिक्षक अशा पद्धतीने पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत.
परीक्षेला आल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. परीक्षेचे गोपनीय साहित्य नेणाऱ्या कर्मचाऱ्याचे लाइव्ह व जीपीएस लोकेशन घेतले जाणार असून परीक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रांवर आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास, अशा विद्यार्थ्यांसह गैरप्रकारात सहभागी व्यक्तींवरदेखील कारवाई केली जाणार आहे.
परीक्षेला काही दिवस उरलेले असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा सराव करून आत्मविश्वासाने व निर्भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
बारावीचे ७४ हजार, दहावीचे ९१ हजार विद्यार्थी
इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत तर दहावीच्या परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान पार पडणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १०८ केंद्रांवर ७४ हजार ९३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इयत्ता दहावीच्या २०३ केंद्रांवर ९१ हजार ६६९ विद्यार्थी परीक्षा देतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.