नाशिक : म्हसरूळच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर वसतिगृहे अधिकृत की अनधिकृत याची माहिती देणारी व्यवस्था जिल्ह्यात नसल्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी वसतिगृहांचे ऑडिट करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ‘प्रत्येक तालुक्यात समितीकडून वसतिगृहांची तपासणी सुरू असून, आठवडाभरात अहवाल येईल असे आश्वासन दिले. (district Collector Gangatharan D statement about report of ashram school hostel Nashik News)
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाच्या आरोपावरून संशयित हर्षल मोरे याला अटक झाली आहे. यावर पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत पडसाद उमटले. आमदारांनी अधिकृत आणि अनधिकृत वसतिगृहांची माहिती उपलब्ध नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थिनींची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असून मान्यता नसलेल्या वसतिगृहांबाबत पोलिस, महिला आणि बालकल्याण विभागाची एकत्रित बैठक घेऊन प्रत्येक तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृहाला भेट देऊन तपासणी करते आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील या पथकांचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होणार असून अनधिकृत आश्रमशाळांबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.