Nashik : रेल्वेकडून कलेक्टरांच्या पत्राला टोपली

Gangadharan D latest marathi news
Gangadharan D latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : शेतकऱ्यांना रासायनिक खताच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी रेल्वे प्रशासनाला नाशिक रोड मालधक्क्यावरील गुदामात एका रेकसाठीची जागा राखीव ठेवण्यासाठी पत्र दिले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने असे धोरण नसल्याचे कारण पुढे करून जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. (district Collector letter to railways for fertilizer rake railway ignorance Nashik latest marathi news)

जिल्ह्यात जूनच्या प्रारंभी ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी तयारी सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे वेळीच खतांचा पुरवठा होणे अपेक्षित असल्याचा विचार करत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी त्यासाठी नाशिक रेल्वे मालधक्का गुदाम आरक्षित ठेवावा, असे पत्र २६ जूनला भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रबंधकांना दिले होते.

परंतु, या पत्रानंतरही खते उतरवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण देत, खतांची वॅगन रेल्वे प्रशासनाने मनमाडच्या मालधक्क्यावर पाठवली होती. रेल्वे प्रशासनाच्या यामुळे नाराज जिल्हाधिकाऱ्यांनी सिमेंटपेक्षा माणसे जगण्यासाठी शेती महत्त्वाची आहे. पेरणी झाली तरच अन्न मिळेल, हे लक्षात ठेवा, अशी समज रेल्वेच्या प्रशासनाला दिली.

Gangadharan D latest marathi news
Dhule : कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर 1 कोटीवर खर्च

यापुढे नाशिक मालधक्यावरच खते उतरायला हवीत यासाठी तत्काळ तीन ते चार रेक मावतील इतके गुदाम रिकामे करून ठेवा. दोन दिवसांत युरियाचे सहा हजार मेट्रिक टन खत येणार आहे. त्यासाठी गुदाम आरक्षित ठेवा, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

परंतु, भुसावळ येथील विभागीय रेल्वे प्रबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत, खतांसाठी गुदाम राखीव ठेवणे, असे रेल्वे प्रशासनाने धोरण नसल्याचे कारण पुढे केले. व्यावसायिक बनलेल्या रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या खतांऐवजी सिमेंटच्या साठ्याला जागा देण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.

Gangadharan D latest marathi news
मंदीची चाहुल : बांधकामाशी संबंधित सव्वाशे व्यवसाय संकटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.