जिल्हाधिकारी कार्यालयाला खड्ड्यांचा विळखा

collector office Nashik latest marathi news
collector office Nashik latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहन पार्किंग शुल्कापोटी रोज हजारोच्या पावत्या फाडल्या जात असताना रस्त्याची देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय महसूल यंत्रणेचे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. विविध विभागाच्या कामकाजासाठी जिल्हाभरातून रोज शेकडो लोक जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. येथे वाहन पार्किंगपोटी लोकांना पैसे मोजावे लागतात. (district Collector Office surrounded by potholes nashik Latest Marathi News)

वाहन पार्किंगचा ठेका जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दिला आहे. त्यापोटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साफसफाई व तेथील रस्त्याची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. किंबहुना तशा अटीवर वाहन पार्किंगचा ठेका दिला जातो.

मागील महिन्यातील संततधार पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ट्रेझरी स्टेट बँकेच्या कार्यालयासमोर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

एका बाजूला अमृत महोत्सव व कार्यालयाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधीचा खर्च होत असताना कार्यालयाच्या आवारातील खड्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्हा कोशागार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयाचा रस्ता, तहसील कार्यालयाचा रस्ता अशा सगळ्याच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

खड्ड्यांत पावसानंतर पाणी साचते. एरवीही खड्ड्यांत वाहन आदळून मनस्ताप सोसावा लागतो आहे. कार्यालयाच्या आवारात वाहन लावण्यासाठी कुठलेही नियम नाहीत. रस्त्याच्या मधोमधच चारचाकी वाहन लावून लोक जात असल्याने प्रसाधनगृहात जाण्यासाठी रस्ता नाही. रस्त्यात लावलेल्या वाहनातून रस्ता काढून कार्यालयात जावे लागते.

collector office Nashik latest marathi news
हरसूलमध्ये Leaf toed Gecko सरड्याचे दर्शन

अटी- शर्ती धाब्यावर

जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन पार्क करण्यासाठी पार्किंगचा ठेका दिला जातो. त्यात, कार्यालयाच्या आवाराची स्वच्छता करण्यासोबतच तेथील अंर्तगत रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज संबंधित ठेकेदाराने पहावे, असे नियमात आहे.

मात्र, रस्त्याची एवढी दुरवस्था होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साधी दखलही घेतली जात नाही. संततधार पाऊस सुरू असताना रस्त्याची दुरुस्ती शक्य नव्हती. मात्र, आठवड्यापासून पाऊस थांबला आहे तरीही खड्ड्यांत साधा मुरूमही टाकला जात नाही. एका बाजूला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र साधे खड्डेही बुजविले जात नाही.

collector office Nashik latest marathi news
पौरोहित्‍यातही महिलाराज : श्रोत्‍यांची प्रतिक्रिया उमेददायी, प्रोत्‍साहनपर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()