नाशिक : जिल्हा बँकेचे मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांकडून वसुली होण्यासाठी जिल्हा बँकेतर्फे आजपासून (ता.१) वसुली मोहिमेस सुरवात होत आहे. जास्तीत जास्त थकबाकीदारांनी आपले कर्ज फेडत पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन बँक प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. (District cooperative bank recovery drive from today Nashik Latest Marathi News)
२०२२ -२०२३ या आर्थिक वर्षातील कर्ज वसुली हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. सद्यःस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती अतिशय खराब असल्याने ही परिस्थिती पूर्वपदावर आणत बँकेची आर्थिक पत वाढविण्यासाठी प्रशासक यांच्याकडून आवश्यक तो सर्व प्रयत्न केले जात आहे. आजमितीस जिल्हा बँकेची एकूण दोन हजार १५६ कोटीची रक्कम वसुलीस पात्र असून त्यापैकी रक्कम एक हजार ४५२ कोटीची जुनी थकबाकी आहे.
वसुली हंगामात जास्तीत जास्त वसुली करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांवर सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास आदेशही प्रशासक यांच्याकडून सर्व शाखांच्या अधिकारी यांना देण्यात आले आहे. या आदेशानुसार आजपासून ही वसुली मोहिम सुरु होत आहे.
यासाठी प्रत्येक तालुक्यात पालक अधिकारी नेमण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर मुख्य शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे त्यांना मदत करत थकीत कर्जदार यांच्याकडे वसुलीसाठी तयार करण्यात येणार आहे. यासह कर्जदार हे एखाद्या योजनेत बसत असल्याचे ती योजना समजावून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार यांनी कर्ज फेडत कारवाई टाळावी, असे आवाहन बँकेचे प्रशासक अरुण कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी केले आहे.
नऊ जणांकडून वसुली
जिल्ह्यातील बडे थकबाकीदार यांच्याकडून वेळेत वसुली न झाल्याने बँकेने सर्वाधिक थकबाकीदार असलेल्या १०० जणांनी यादीच प्रसिद्ध केली होती. सदरची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ९ बडे थकबाकीदार यांच्याकडून सुमारे ९ कोटींची वसुली देखील अद्यापपर्यंत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.