Nashik Bribe Crime: जिल्हा उपनिबंधक खरे यास 30 लाखांची लाच घेताना अटक; ACBची कॉलेज रोडवर कारवाई

Satish Khare arrested
Satish Khare arrestedesakal
Updated on

Nashik Bribe Crime : नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री केली लाचखोर खरे यांच्या समवेत खाजगी इस्मालाही पथकाने ताब्यात घेतली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (District Deputy Registrar arrested for taking bribe of Rs 30 lakh ACB action on College Road Nashik Bribe Crime)

सतिश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१) रा. आई हाईट्स, कॉलेज रोड), adv शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत.

त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Satish Khare arrested
Jalgaon Crime News : सिनेस्टाईल पाठलाग करून 2 दरोडेखोर ताब्यात; पोलिस पथकाची कारवाई

सदरची लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.

घरझडती सुरू

दरम्यान विभागाचे अपरधीश नारायण निहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या कॉलेज रोडवरील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Satish Khare arrested
Dhule Crime News : पायऱ्या बांधण्यावरून 2 गटांत हाणामारी! 19 जणांविरूद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.