Nashik: झिरो पेन्डसी, सहकारी संस्था बळकटीकरणावर भर; जिल्हा उपनिंबधक फय्याज मुलानी यांनी स्वीकारली सूत्रे

District Deputy Commissioner Fayyaz Mulani took over the instructions and started the work
District Deputy Commissioner Fayyaz Mulani took over the instructions and started the workesakal
Updated on

Nashik News : तत्कालीन जिल्हा उपनिंबधक सतीश खरे निलंबीत केल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पदोन्नतीने बदली झालेले फय्याज मुलानी यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरूवात केली आहे.

जिल्हा उपनिंबधक कार्यालयात काम करताना कोणत्याही विभागाची फाईल फार काळ राहणार नसल्याचे जिल्हा उपनिंबधक मुलानी यांनी सांगत, झिरो पेन्डन्सी हाच अजेंडा राबवत काम करणार असल्याचे सांगितले.

तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था बळकटीकरणासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे मुलानी यांनी यावेळी सांगितले. (District Deputy registrar Fayyaz Mulani accepted post after satish khare bribe case nashik news)

ऑगस्ट २०१९ मध्ये मुलानी नाशिक तालुका उपनिंबधक पदावर कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी पुणे उपनिंबधक म्हणून काम करण्याचा अनुभव होता. तालुका उपनिंबधक असताना त्यांच्याकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्षभर प्रशासक म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली होती.

मुलानी सोमवारी जिल्हा उपनिंबधक पदाचा पदभार स्वीकारणार होते. परंतू, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला नाही. मंगळवारी (ता.३०) त्यांनी विभागीय सहनिंबधक विलास गावडे यांची भेट घेत, कागदोपत्री पदभार घेतला.

आज (ता.३१) त्यांनी जिल्हा उपनिंबधक कार्यालयात येऊन अधिकृतपणे सुत्रे हाती घेत थेट कामकाजाला सुरूवात केली. विभागातील कर्मचार्यांची बैठक घेत त्यांनी संवाद साधला. तसेच कामकाज समजावून घेत कामाला सुरूवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District Deputy Commissioner Fayyaz Mulani took over the instructions and started the work
BJP Women State Executive: भाजप महिला प्रदेश कार्यकारिणीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

सहकारी संस्थां, बॅंका, पतसंस्था, बाजार समित्या आदींच्या कामकाजाबाबत असलेल्या फाईली वेळात काढण्यावर भर राहणार आहे. विनाकारण फाइल अडवणूक न करता वेळात फाइल काढावी, अशा सूचना देखील विभागातील कर्मचार्यांना दिल्याचे मुलानी यांनी सांगितले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक म्हणून एक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. यात काम करतांना संस्थेला २० कोटींचा नफ्यात आणत खर्च कमी केला. याच धर्तीवर विभागाचे कामकाज करण्याचा मानस असल्याचे जिल्हा उपनिंबधक मुलानी यांनी सांगितले.

District Deputy Commissioner Fayyaz Mulani took over the instructions and started the work
Nashik Officers Retirement : सहाय्यक आयुक्तांसह 32 अधिकारी- कर्मचारी निवृत्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()