नाशिक : कुलंग किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची ७ तासांनंतर सुटका

Kulung Fort
Kulung FortSakal
Updated on

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम जवळील कुरुंगवाडी येथील कुलंग किल्यावर अडकलेल्या पर्यटकांना सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप खाली उतरवण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमला सोमवार (ता.३० रोजी ) यश आले.


भावली डॅम जवळ असलेल्या कुरुंगवाडी येथील कुलंग गडावर बडोदा येथील १३ पर्यटक रविवार ( ता.२९ रोजी ) फिरण्यासाठी आले होते. किल्यावर फिरत असताना रस्ता चुकले उशीर झाल्यामुळे त्यांनी रात्री तेथेच थांबण्याचा ठरवले. मात्र जंगलचा परिसर असल्याने त्यांना भीती वाटायला लागली. नशीब चांगले म्हणून त्यांच्या मोबाइलला नेटवर्क होते, त्यांनी रात्री तीन वाजेच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात फोन केला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या टिमने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्या मदतीने कुरुंगवाडी गाठले व तेथे स्थानिकांच्या मदतीने त्यांनी शोध मोहीम सुरू केली. दहा जण वेगवेगळ्या दिशेला शोध घेत होते, मोबाईल नेटवर्क असल्यामुळे पर्यटक सतत आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचा संपर्कात होते, अखेर सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना खाली आणण्यात यश आले.

Kulung Fort
नाशिक : इगतपुरी कुलंग फोर्टच्या डोंगरउतारावर अडकले 13 जण

किल्ल्यावर अडकेल्या पर्यटकांची नावे आकाश विजयकुमार कसोरे, विजय दिनेश सोलंकी, माधवी अजित वामतोरे, प्रभू दस्त मासी प्रसाद, ग्लिम्स पंकज रॉयल, ग्लोरियस पंकज रॉयल, स्टेलोंन सुभाषकुमार क्रिस्टी, नीता संतोष मिश्रा, न्यास संतोष मिश्रा, चिलसी मेहुल परमार, रेक्स निसन मास्टर, प्रमोद अँडरसन, जोशीन देवेन राहणार बडोदा, गुजरात अशी आहेत.

भावली डॅम जवळील कुरुंगवाडी येथील कुलंग किल्यावर अडकलेल्या पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मोबाईलद्वारे संपर्क करताच या टिमने परिसरात जाऊन त्यांचा शोध घेत आज दुपारी १२.३० वाजता सुखरुप खाली आणले आहे.कोणत्याही पर्यटकांना कुठलीही इजा झालेली नाही.सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना खाली आणण्यात यश आले.
- परमेश्वर कासुळे, तहसिलदार.

Kulung Fort
नाशिक : जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()