Nashik Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ठाकरे-पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी महेश मुळे यांची बिनविरोध निवड झाली.
बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ठाकरे-पाटील व उपाध्यक्ष मुळे यांचे संचालक मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. (District Government and Parishad Cooperative Bank election Balasaheb Thackeray Patil elected as President nashik)
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेच्या निवडणूक अधिकारी गौतम बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १९) बॅंकेच्या सभागृहात संचालक मंडळाची विशेष सभा झाली. अध्यक्षपदासाठी ठाकरे-पाटील यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी मुळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
त्यामुळे निवडणूक अधिकारी बलसाने यांनी ठाकरे-पाटील व मुळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. निवड झाल्यावर सर्वांना विश्वासात घेऊन सभासद हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
सभेला संचालक रवींद्र आंधळे, प्रमोद निरगुडे, अजित आव्हाड, विक्रम पिंगळे, सुनील गिते, विनोद जवागे, विजय देवरे-पाटील, नीलेश देशमुख, रवींद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर माळोदे, भरत राठोड, जयंत शिंदे, अभिजित घोडेराव, अमोल बागूल, रमेश बोडके, सचिन विंचूरकर, मोहन गांगुर्डे, धनश्री कापडणीस, मंदाकिनी पवार यांच्यासह पॅनलचे ज्येष्ठ नेते उत्तमबाबा गांगुर्डे, महेश आव्हाड, रवींद्र थेटे, दिलीप सरोदे, दिलीप थेटे, बबनराव भोसले, रमणअण्णा मोरे, दादाभाऊ निकम, प्रकाश आहेर, शोभा खैरनार, सचिन पाटील, संदीप वडजे आदी उपस्थित होते.
‘समता’च्या हाती सत्ता
बॅंकेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे-पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी महेश मुळे यांची निवड झालेली असली, तरी या निवडीवरून संचालक मंडळांतर्गत नाराजी नाट्य रंगल्याचे बोलले जात आहे.
नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी बहुतांश संचालकांची होती. मात्र, असे असतानाही कोअर कमिटीने अनुभवी निकष लावत ठाकरे-पाटील व मुळे यांनी संधी दिली.
हे दोघेही समता पॅनलमधून सहकारकडे आले होते. त्यामुळे ‘समता’च्या हाती सत्ता आल्याची कुजबूज संचालकांमध्ये रंगली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे रंगले नाराजी नाट्य
अध्यक्षपदासाठी नीलेश देशमुख, रवींद्र आंधळे, प्रमोद निरगुडे, सुनील गिते, बाळासाहेब ठाकरे-पाटील न मंदाकिनी पवार यांची नावे असल्याने मोठी रस्सीखेच होती. यात पवार व देशमुख यांनी माघार घेतली.
अखेरच्या टप्प्यात आंधळे, निरगुडे, गिते व ठाकरे यांची नावे राहिली. संचालक मंडळातील बहुतांश संचालकांकडून जिल्हा परिषद केडरला यातही निरगुडे किंवा आंधळे यांना संधी द्यावी, अशी मागणी होती.
मात्र, असे असतानाही एकमत न झाल्याने पॅनलच्या नेत्यांच्या कोअर कमिटीला पाचारण करीत साकडे घातले. कोअर कमिटीने संचालकांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित असताना त्यांनी थेट इच्छुकांशी चर्चा करीत ठाकरे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जाते.
या नावाला अनेक संचालकांनी सभागृहात विरोध दर्शविला. यात काही संचालकांमध्ये तू तू-मैं मैं झाली. त्यानंतर एका इच्छुकाने थेट अर्ज दाखल करण्याची तयारीही केली होती. मात्र, संचालकांकडून त्याची समजूत काढण्यात आली. त्यामुळे २१ संचालकांमध्येच पहिल्याच निवडणुकीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.