Bank Election: 21 जागांसाठी विक्रमी 160 अर्ज दाखल; छाननीनंतर मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध होणार

election
electionesakal
Updated on

Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.२) इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.

दिवसभरात विविध पदासाठी ४७ अर्ज दाखल झाले. २१ जागांसाठी एकूण १६० अर्ज प्राप्त झाले असून २५९ अर्जाची विक्री झालेली आहे. प्राप्त झालेल्या अर्जाची सोमवारी (ता.५) छाननी केली जाणार आहे. (District Government and Parishad Staff Bank Five Yearly Election Record 160 applications filed for 21 seats nashik news)

बँकेचे एकूण सभासद १३, २४० असून २१ जागांसाठी बँकेची निवडणूक लढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधारण गट १२, तालुका प्रतिनिधी ४, महिला संवर्ग २, एससी, एसटी १, व्हिजेएनटी १, ओबीसी १ अशा एकूण २१ जागांवर लढत होत आहे.

विभागीय उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे. वैध नामनिर्देशन पत्रांची सूची मंगळवारी (ता.६) निवडणूक कार्यालय नोटीस बोर्डावर बघावयास मिळणार आहे.

६ जून ते २० जून या कालावधीदरम्यान उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान निवडणूक कार्यालयात नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन २१ जून रोजी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

election
Nashik News: नाशिक विभागामधील 2 हजार 904 वाड्यांसह वस्त्या अन रस्त्यांची जातिवाचक नावे बदलली

२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३ जुलै रोजी मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था गौतम बलसाने काम बघत आहे.

दाखल झालेले अर्ज

सर्वसाधारण गट - ७९ अर्ज

तालुक्यातून निवडून द्यायचे प्रतिनिधी - ३४ अर्ज

इतर मागास प्रवर्ग - ११ अर्ज

महिला राखीव गट - १३ अर्ज

अनु. जाती/जमाती गट - ९ अर्ज

विमुक्त जाती भटक्या जमाती - १४ अर्ज

election
Nashik News: गोंदे ते पिंपरीसदो रस्त्याचे होणार 'व्हाइट टॉपिंग'द्वारे सहापदरीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.