Nashik COVID Update : जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’; तातडीच्या बैठकीत आढावा

देशात पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हायरंटचे रुग्ण वाढू लागले आहेत.
District Health System Alert for covid jn1 variant nashik news
District Health System Alert for covid jn1 variant nashik newsesakal
Updated on

Nashik COVID Update : देशात पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हायरंटचे रुग्ण वाढू लागले आहेत. बहुतेक राज्यामध्येही रुग्णसंख्या वेगात वाढत असताना, महाराष्ट्रातही आरोग्य विभागाने सतर्कता व सज्जतेचे आदेश दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोनासदृश्य रुग्ण आढळूनआल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. (District Health System Alert for covid jn1 variant nashik news)

जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत जबाबदारी निश्चित करीत अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनासदृश्य एक रुग्ण दाखल झालेला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील असलेला कोरोनासदृश्य रुग्णाचा अहवाल (आरटीपीसीआर) अद्याप प्राप्त झालेला नाही.

मात्र तरीही त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये देशात पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हायरंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: केरळ राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुखांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली.

त्यामध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसंदर्भात आढावा घेण्यात आला. कोरोनाचे रुग्ण वाढ होऊ लागल्यास तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

District Health System Alert for covid jn1 variant nashik news
Covid New Variant JN.1 : केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची एन्ट्री; दोघांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट मोडवर

एकाचा अहवाल प्रलंबित

नाशिक महापालिका हद्दीमध्ये खासगी रुग्णालयात कोरोनासदृश्य रुग्णाचा मृत्यु झाला आहे. या मयत रुग्ण कोरोना बाधित होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासंदर्भात वैद्यकीय चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सज्जतेच्या उपाययोजना

ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक वा नजिकच्या उपजिल्हा वा ग्रामीण रुग्णालयातच उपचार व्हावेत या दृष्टीकोनातून सज्जतेच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुसज्ज खाटा व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना थेट नाशिकमध्ये येण्याचा त्रास वाचेल आणि त्यांना जागेवरच उपचाराच्या सुविधा मिळू शकणार आहेत.

''कोरोनाचा नवीन व्हायरंटचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाअंतर्गत दक्षता घेण्यात आली आहे. रुग्णालयांमध्ये जादा खाटा सज्ज ठेवण्यात आले असून उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत.'' - डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

District Health System Alert for covid jn1 variant nashik news
COVID-19 Jn.1 Variant : प्रतिकारशक्तीलाही जुमानत नाही कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; 'ही' पाच लक्षणं दिसली तर सावध व्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.