Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात 2 तास वीज गायब; उपकरणे बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय

civil hospital
civil hospitalesakal
Updated on

Nashik News : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, शनिवारी (ता. २०) दुपारी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात अंधारात होते. (District hospital lost electricity for 2 hours nashik news)

वीज नसल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराशी संबंधित उपकरणे बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय झाली. तर, जिल्हा रुग्णालयातील जनरेटरमध्येही बिघाड असल्याने तेही सुरू होऊ न शकल्याने रुग्णालय व्यवस्थापनाचा भोंगळ कारभारही यामुळे उघड झाला.

शहरातच नव्हे तर राज्यभर उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे साहजिकच विजेची मागणी वाढलेली आहे. त्यातही दिवसा वीज असतानाही नाशिककरांची उन्हाच्या झळांनी काहिली होत असताना, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यास नाशिककर पुरते हैराण होतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असतो.

शनिवारीही तोच अनुभव आला. जिल्हा रुग्णालय परिसरात दुपारी साडेतीन- चारच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी वीज नसल्याने अतिदक्षता विभागांसह विविध विभागांमध्ये अंधार पसरला. त्यात बाहेर उन्हाची तीव्रता वाढली असल्याने या विभागांमध्ये रुग्णांनाही त्रास जाणवू लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

civil hospital
NAFED Onion Purchase : नाफेडतर्फे होणार 3 लाख क्विंटल कांदा खरेदी : डॉ. भारती पवार

तसेच, रुग्णांच्या उपचारासाठी असलेली साधनेही बंद पडल्याने रुग्णांची गैरसोय झाली. सोनोग्राफी, सिटी स्कॅन यंत्रणाही बंद पडली. त्यामुळे ताटकळत असलेले रुग्णांची गैरसोय झाली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अशा आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी जनरेटरचीही सुविधा आहे.

परंतु, या वेळी जनरेटरमध्येही बिघाड असल्याची बाब समोर आल्याने तेही बंद होते. त्यामुळे समस्येत आणखीच भर पडली. तब्बल सुमारे दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर रुग्णांना दिलासा मिळाला.

"वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची काहीशी गैरसोय झाली. परंतु अत्यावश्‍यक सेवेतील यंत्रणा सुरू होत्या. त्यामुळे रुग्णांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. या समस्येवर तातडीने तोडगा काढून उपाययोजना केली जाईल." - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

civil hospital
Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात गढूळ पाणीपुरवठा; भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.