शिवभोजन थाळी वितरणात विभागात 'नाशिक' जिल्हा अव्वल!

shivbhojan thali
shivbhojan thaliesakal
Updated on

नाशिक रोड : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीच्या (shivbhojan thali) लाभार्थ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात (north maharashtra) रोज सोळा हजार ९२५ शिवभजन थाळ्या सध्या वितरित केल्या जात असून, त्यात उत्तर महाराष्ट्रात नाशिक (nashik) जिल्हा अव्वल आहे.

पाचही जिल्ह्यांत होते सोळा हजार ९२५ थाळींचे वितरण

सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या गोरगरिबांना या थाळीचा फायदा होत आहे. वरण, भात, भाजी, पोळी असा परिपूर्ण सात्त्विक आहार असणारी ही शिवभोजन थाळी खाल्ल्यावर गरिबांची पोटाची भूक भागत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पंधरा तालुक्यांत १३८ शिवभोजन थाळी केंद्र असून, त्या माध्यमातून सात हजार थाळ्या वितरित केल्या जातात. पहिल्याच दिवशी या थाळी वितरणामध्ये शिवभोजन केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गरीब लोकांनी रांगा लावल्या होत्या. थाळीच्या वितरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवभोजन थाळी म्हणजे कोरोनावर सध्या बूस्टर डोस समजला जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासह गरीब लोकांना सात्त्विक अन्न खायला मिळत आहे.

shivbhojan thali
OBC Reservation : छगन भुजबळ घेणार कपिल सिब्बल यांची भेट

उत्तर महाराष्ट्राची स्थिती

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांत मिळून सध्या रोज १६ हजार ९२५ शिवभोजन थाळी वितरित होत आहेत. नाशिक जिल्ह्यात सात हजार शिवभोजन थाळी वितरित होत आहेत. तर नगर जिल्ह्यात २८ केंद्रांमधून तीन हजार ५००, जळगाव जिल्ह्यात ३८ केंद्रांद्वारे तीन हजार ४२५, धुळे जिल्ह्यात १५ केंद्रांद्वारे एक हजार ५००, तर नंदुरबार जिल्ह्यात १२ केंद्रांमधून रोज एक हजार ५०० शिवभोजन थाळ्या वितरित होत आहेत.

shivbhojan thali
शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार पुष्पा पाटील यांच्‍याकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.