Nashik: जिल्हा महिला कल्याण विभागाने केली 'त्या' प्रकरणाची चौकशी; शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस

प्रथमदर्शनी संबंधित शाळेवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
minor girl pregnancy
minor girl pregnancyesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीची माहिती दडविल्या प्रकरणाची केंद्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दखल घेतल्यामुळे जिल्हा महिला बालकल्याण विभागानेदेखील आता चौकशी सुरू केली.

त्यांनी रूग्णालयात जाऊन संबंधित पीडित मुलीची चौकशी केली. दरम्यान, याप्रकरणी आयुक्तालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने मंगळवारी (ता. २) अहवाल आदिवासी विकास आयुक्तांना सादर केला.

यात, प्रथमदर्शनी संबंधित शाळेवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. (district women child welfare department started inquiry Central Scheduled Tribes Commission notice case minor girl mother reputed school in nashik)

अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कळमनुरी एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत निवड झालेली व सध्या नाशिक अप्पर आयुक्त कार्यालय अंतर्गत कळवण प्रकल्पातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची आणि त्यानंतर तिची प्रसूती झाल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना गत आठवड्यात उघडकीस आली होती.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने उघडकीस आणलेल्या या घटनेनंतर आयुक्तालयाकडून तातडीने पाच सदस्यीय महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीला 2 जानेवारी पर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

त्यानुसार सदर समितीच्या सदस्यांनी संबंधित नामांकित शाला तसेच कळमनुरी येथील प्रकल्पात जाऊन चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर समितीने अहवाल तयार करत, मंगळवारी आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे सादर केला.

minor girl pregnancy
Nashik ZP News : जि. प. च्या सर्व संवर्ग सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

समिती समवेत पोलिसांनीदेखील आपला गोपनीय अहवाल सादर केला असल्याचे समजते. यात, या घटनेत गंभीर निष्काळजीपणा समोर आल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित करण्यात आला आहे.

समितीने केलेल्या चौकशी नंतर शाळेवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे सुचविण्यात आले असल्याचेही समजते.

केंद्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने हे प्रकरण गंभीरतेने घेतल्याने समितीने दिलेल्या अहवालात दोषींवर प्रस्तावित कारवाई अधिक कठोर करण्यासंदर्भात आायुक्तालय विचार करीत असल्याचे बोलले जात आहे.

minor girl pregnancy
Maharashtra News: अधिकांश राज्य होणार दुष्काळसदृश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.