Youth Festival: युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दर वर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. २०२३-२०२४ वर्षाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या ५ डिसेंबरला होणार आहे.
त्याअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले असून, विजेत्यांना पुढील फेरीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. (District Youth Festival will be held on December 5 nashik news)
पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, तसेच कृषी आयुक्तालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्था यांच्यातर्फे ५ डिसेंबरला लोकनृत्य : समूह आणि वैयक्तिक ही स्पर्धा मविप्र संस्थेच्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. इतर स्पर्धा मविप्र संस्थेच्या उदोजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय आवारात होणार आहे, याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली.
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३-२०२४ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्नवाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व या दोन संकल्पना दिलेल्या आहेत. या संकल्पनेवर आधारित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
...असे आहे स्पर्धांचे नियोजन
५ डिसेंबरला सकाळी दहापासून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कथालेखन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, तसेच पोस्टर स्पर्धा होणार आहे. विजेत्यास प्रथम तीन हजार, द्वितीय दोन हजार आणि तृतीय एक हजार पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. समूह लोकनृत्य स्पर्धेसाठी विजेत्यास प्रथम सात हजार, द्वितीय पाच हजार आणि तृतीय बक्षीस तीन हजार दिले जाईल.
वैयक्तिक लोकनृत्य स्पर्धेसाठी विजेत्यास प्रथम तीन हजार, द्वितीय दोन हजार, तर दीड हजार रुपये बक्षीस देण्यात येईल.
लोकगीत स्पर्धेत प्रथम पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार ५०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. वैयक्तिक लोकगीत स्पर्धेसाठी तसेच वक्तृत्व स्पर्धा इंग्रजी व हिंदीचे या स्पर्धांसाठी प्रथम तीन हजार, द्वितीय दोन हजार, तृतीय दीड हजारांचे बक्षीस असेल.
संकल्पना आधारित स्पर्धेसाठी राज्यासाठी तृणधान्य उत्पन्नवाढीसाठी विज्ञानाचा वापर सहभाग व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या दोन स्पर्धा होतील. याशिवाय कथालेखन, फोटोग्राफी, पोस्टर स्पर्धांचे आयोजन केले आहे. फोटोग्राफी स्पर्धेसाठी स्पर्धकाने दोन छायाचित्रे बंद पाकिटात १ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात दुपारी बारापर्यंत सादर करावे, असे आवाहन केले आहे.
अशा आहेत सहभागाच्या अटी
युवा महोत्सवात सहभागासाठी स्पर्धकांचे वय १५ ते २९ वर्षे यादरम्यान असावे. तसेच जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, महिला मंडळ, १५ ते २९ वयोगटांतील युवक व युवती सहभागासाठी पात्र असतील. स्पर्धेसाठी स्पर्धक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता, जन्मतारीख, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी व वयाबाबत सबळ पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
त्याकरिता स्पर्धकांने विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज व ओळखपत्र १ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे जमा करण्याचे आवाहन केले आहे. महोत्सवात सहभागासाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरून किंवा ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे १ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा करावे. मुदतीनंतर येणारे व स्पर्धेच्या दिवशी वेळेवर येणारे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.