नाशिक : पहिल्या पत्नीला घटस्फोट (Divorce) दिलेला नसताना नवऱ्याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जातपंचायतीला मान्य नाही. फोनवर घटस्फोट केल्याचा घृणास्पद प्रकार सिन्नर (जि. नाशिक) येथे उघडकीस आला.
महिलेच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट
सिन्नर येथील अश्विनी या महिलेचे लोणी (नगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जातपंचायत बसविली. जातपंचायतीने या महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला.
जातपंचायतीने पीडित महिलेला पोलिस ठाण्यात जाण्यापासून रोखले. तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तिला अवघड गेले. आठ दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असह्य झाला. सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ही बाब समोर आली आहे. न्यायालयाने घटस्फोट दिला नसताना पंचांच्या भूमिकेमुळे नवऱ्याने दुसरे लग्न केले. त्यामुळे जातपंचायतीच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व अॅड. रंजना गवांदे हे मदतीसाठी पुढाकार घेत त्याविरोधात आवाज उठवला आहे.
''राज्य सरकारने जातपंचायतीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला; परंतु जातपंचाच्या दहशत समाजात अजूनही कायम आहेत. प्रबोधनासोबत या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास जातपंचायतींना मूठमाती देता येईल.'' - कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.