सतीश गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
धुळगाव (जि. नाशिक) : जन्मतःच अंध, सहा महिन्यापूर्वीच वडील दत्तात्रय आहेर यांचे कोरोनाने निधनामुळे गमावलेले छत्र असा संकटांचा डोंगर उभा असताना जराही न खचता येथील वैभव आहेर या तरुणाने डोळसांनाही लाजवेल असे यश संपादन केले आहे. दुःख बाजूला ठेवत वडिलांनी सांगितलेल्या मार्गावर जात जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे वैभवचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) एक्झिक्युटिव्ह पदावर त्याची निवड झाली आहे.
दिव्यांग वैभव दत्तात्रय आहेर यांची यशोगाथा
प्रसंग कितीही कठीण असला तरी यशाला गवसणी घालता येते हेच त्याने दाखवून दिले आहे. वैभवचे प्राथमिक शिक्षण हे धुळगाव येथे झाले. जन्मताच दृष्टी नव्हती, वडील दत्तात्रय आहेर हे राजकीय नेते होते, मे महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचे निधन झाले. ‘वैभव तू शिकला पाहिजे, प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे असे त्याचे वडील त्याला सतत सांगत, प्रोत्साहन देत असत. सतत सकारात्मक विचार त्यांनी त्याच्यावर रुजवले. गावच्या प्राथमिक शाळेत शिकत असताना शिक्षिका मिना शेवाळे यांनी स्वतःच्या मुला इतकच प्रेम त्याला दिले. त्याला शिकण्यासाठी प्रकाश अहिरे सरांनीही नेहमीच प्रोत्साहन दिले.
वडील आणि वडिलांचे मित्र शेतकरी संघटनेचे नेते मोहन गुंजाळ यांनी वैभवला पुढच्या शिक्षणासाठी नाशिकला एचपीटी महाविद्यालयात पाठवलं तेथे एम. ए. राज्यशास्त्रात पूर्ण केले व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला. वडिलांचे शब्द नेहमीच ध्यानात ठेवत त्याने बॅंकेच्या परिक्षेसाठी कठोर मेहनत घेण्यास सुरवात केली अन त्याच्या कष्टाला फळ आले, आयडीबीआय बॅंकेत त्याला संधी मिळाली. सामान्य लोकांच्या सेवेसाठी ही संधी मिळाल्याचे मानत न्याय देण्याचा प्रयत्न करू असे वैभवने सांगितले. दरम्यान त्याच्या यशाबद्द गावात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.