इगतपुरी (जि. नाशिक) : दिवाळी म्हणजे सर्वांच्या आवडीचा सण व उत्सव होय. मात्र दिवाळीच्या सणावर आणि फराळावर महागाईचे विरजण पडले आहे. दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी बसते आहे, यामुळे सामान्य मध्यवर्गीय आणि सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यायांसाठी महागाईमुळे फराळाचा गोडवा यंदा काहिसा कमी झाला आहे. दिवाळीच्या सणावरही महागाईचे सावट असले तरी निराध न होता परंपरेची सांगड घालणाऱ्या या सणात नागरिक आनंदाने सहभागी झाला आहे. (Diwali Faral Inflation reduces sweetness of Faral Demand for readymade goods continues Nashik news)
मागील एक दोन वर्षाच्या तुलनेत पदार्थांच्या दरात पाच ते आठ टक्क्यांच्या घरात वाढ झाली आहे. डाळी, तूप, साखर अशा सर्व जिन्नसांच्या किंमती वाढल्या आहेत. केंद्र सरकारने किराणा मालावर जीवनावश्यक वस्तूंवर सरसकट जीएसटी लागू केल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. दही, तूप, लोण्यानंतर गूळ, पोह्यावरही जीएसटी लागू झाल्याने दगडी पोहे, जाड पोहे, भाजक्या पोह्याचे दर वाढले आहेत.
पोह्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. गूळ, तूप, शेंगदाणे, वेगवेगळ्या डाळींच्या भाववाढीची स्पर्धाही कायम असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे २५ किलोच्यावर वस्तू घेतल्या तर त्यावर जीएसटी नाही. २५ किलोच्या आतील वस्तू घेतल्या तर त्यावर जीएसटी लावला जात आहे.
तयार फराळही महागला
दिवाळीसाठीचे खास आकर्षण असलेला मोतीचूर लाडू २६० ते ३०० रुपये किलोच्या घरात गेला आहे. तुपातील रवा लाडू ४४० ते ४५० रु. किलो, तुपातील बेसन लाडू ४८० ते ४८५ रूपये प्रतिकिलो, तुपातील डिंक लाडू ६०० किलोप्रमाणे आहेत. तळलेला चिवडा २५० ते २६० रूपयांच्या घरात गेला आहे.
पातळ पोहे चिवडा ३०० रूपये किलो, भाजके पोहे चिवडा २६० रूपये किलो,चकली (भाजणी) : ३२० रु.किलो, शंकरपाळी गोड : ३२० रु,तर तिखट शंकरपाळी प्रतिकिलो ३२० रु.किलो, करंजी चाळीस नगाला ६०० रु,खाजा ३० नग : ३०० रु,खारी बुंदी तसेच मसाला बुंदी २४० रु.किलो आहे.
बचत गटांत ‘फीलगुड
बाजारात तयार फराळाला मागणी आहे. यातूनच ग्रामीण आणि शहरी भागात देखील महिला बचत गटदेखील सरसावले आहेत. दिवाळीतील बहुतेक फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. मात्र सध्या बाजारात उपलब्ध तयार पदार्थांनादेखील चांगली मागणी असते.
याच संधीचा फायदा घेण्यासाठी बचत गटदेखील तयारीस लागले आहेत ग्राहकांना बाजारातील फराळाबरोबरच घरगुती स्वाद देणाऱ्या फराळाचा पर्याय म्हणून महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांनाही चांगला रोजगार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.