Diwali Festival 2022 : यंदा भेटवस्तू खरेदीस दमदार प्रतिसाद!

Shop decorated with Diwali gifts.
Shop decorated with Diwali gifts.esakal
Updated on

जुने नाशिक : दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तूंची बाजारपेठ सजली आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा भेटवस्तू खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीने सर्वांमध्ये नवचैतन्य येत असते. त्यातल्या त्यात कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षानंतर दिवाळी उत्साहात साजरी करण्यास मिळत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. (Diwali Festival 2022 Strong response to buying gifts this year Nashik Latest Marathi News)

Shop decorated with Diwali gifts.
Healthy Plan for Diwali : ‘चटपटीत’चा टाळा मोह, पौष्टिक आहारातून सुदृढ रहा..!

दिवाळीमध्ये एकमेकांना आपुलकीच्या भावनेतून तसेच मित्रत्वाचे संबंध कायम अबाधित राहण्यासाठी भेटवस्तू देण्याची परंपरा तर आहेच. शिवाय दिवाळीच्या औचित्य साधून दुसऱ्यांप्रति ऋण व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यानिमित्त मालकांकडून कामगारांस तसेच शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे गिफ्ट दिले जातात.

परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष नागरिकांमधील भीती आणि प्रादुर्भावामुळे दिवाळी अतिशय साध्या पद्धतीने साजरी झाली. भेटवस्तू देण्याच्या परंपरेस कुठेतरी खंड पडला. या वर्षी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याने सर्वत्र उत्साह आहे. भेटवस्तूंची बाजारपेठही सजली आहे. साधे पेन, क्रॉकरी वस्तू, काचेचे शोपीस, आकर्षक लॅम्प, कॉपरमध्ये आलेल्या नावीन्यपूर्ण घरगुती वापरातील वस्तू, स्टील वर्क, सिल्वर पॉलिश असलेले भांडे, अशा विविध प्रकारच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तूंना मागणी वाढली आहे.

Shop decorated with Diwali gifts.
Diwali Nauvari Saree : नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान!

५० रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू भेटवस्तू म्हणून खरेदी-विक्री होत आहे. घरगुती तसेच दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंमध्ये १० ते २५ टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. यंदा दिवाळीचा उत्साह अधिक असल्याने भेटवस्तूसह अन्य वस्तू खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत होता. परंतु, गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने व्यवसायावर परिणाम झाला आहे.

व्यावसायिकांमध्ये त्यामुळे नाराजी दिसून येत आहे. असे जरी असले तरी दोन वर्षांपूर्वीच्या बाजारपेठेतील मागणीपर्यंत आत्तापर्यंतचे बाजारपेठ पोचले आहे. नागरिकांची शेवटचे दोन ते तीन दिवस खरेदी करण्यास पसंती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात मागणी वाढण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

"महागाईमुळे दरांमध्ये दहा ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत खरेदी विक्रीस यंदा प्रतिसाद चांगला आहे. पावसाचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. नाहीतर यापेक्षाही चांगली बाजारपेठ राहिली असती." - नितीन मुलतानी, व्यावसायिक

Shop decorated with Diwali gifts.
Diwali Festival : आली दिवाळी, चला मामाच्या घरी; बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.