Diwali Festival 2023: नाशिककरांच्या उत्सवाला संरक्षण; शासकीय यंत्रणेची दिवाळी तयारी सुरू

Diwali Festival
Diwali Festival esakal
Updated on

Diwali Festival 2023 : पुढील आठवड्यापासून दिवाळी सुरू होत आहे. एकीकडे नाशिककरांकडून सण साजरा केला जात असताना दुसरीकडे पोलिस, महापालिका, अग्निशमन विभाग, शासकीय रुग्णालये सज्ज झाली आहे.

कुठली जीवित व वित्तहानी होवू नये म्हणून सणासुदीला सुटी न घेता डोळ्यात तेल घालून नाशिककरांच्या उत्सवाला संरक्षण देणार आहे. घरोघरी दिवाळीची तयारी सुरू आहे. या तयारीबरोबरच शासकीय यंत्रणादेखील कामाला लागली आहे. कुठल्या विभागाची काय तयारी आहे, याचा घेतलेला आढावा. (Diwali preparations of government system have started nashik news)

पोलिस चोवीस तास तैनात

- औद्योगिक वसाहतींत विशेष बंदोबस्त.

- सिडको-सातपूर कामगार वसाहतीतही पोलिस गस्त.

- २० सुरक्षारक्षकही पोलिसांसमवेत गस्तीवर.

- एमआयडीसीसाठी १२ ते १८ तारखेपर्यंत सुट्टी.

- शहर परिसरात दिवस व रात्र गस्ती पथकांमध्ये वाढ.

- पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथकांचे नियोजन.

- बसस्थानक, रेल्वे स्थानकावर विशेष गस्तीपथक.

वाहतुकीचे काटेकोर नियोजन

- गर्दीच्या ठिकाणी गस्त.

- मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांची गस्ती.

- वाहतूक नियंत्रणासाठी चार युनिट पथके.

- बाजारपेठेमध्ये फिरते गस्ती वाहन.

Diwali Festival
Asha Workers Protest: सरकारने कंत्राटी कर्मचारी दर्जांबाबत निर्णय घ्यावा; झिरवाळ यांच्या सूचना

जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था

- अपघातग्रस्तांसाठी आपत्कालीन व्यवस्थेकडून सज्जता.

- आपत्कालीन कक्ष प्रमुखांसह उपयुक्त औषधसाठा सज्ज.

- रुग्णवाहिका व सपोर्ट स्टॉप नियुक्ती.

एसटीने वाढविल्या फेऱ्या

- जिल्हा आगारातून जादा बसगाड्या.

- बुधवार (ता. ८) पासून हंगामी भाडेवाढ जाहीर.

- पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर अतिरिक्त फेऱ्या.

- पुणे, बोरिवली, कसारा मार्गावर अतिरिक्त फेऱ्या.

- मालेगाव, सटाणा, मनमाड, नांदगांव अतिरिक्त फेऱ्या.

- इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, पिंपळगाव अतिरिक्त फेऱ्या.

- महिला सन्मान योजनेअंतर्गत सवलत.

- ज्‍येष्ठ नागरिकांना सवलत.

- शिवशाही सेवा प्रकारात सवलत.

Diwali Festival
Diwali Festival : दिवाळीत साडेतीन लाख कोटींचा व्यवसायाचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तविला

- अतिरिक्‍त फेऱ्यासाठी सातशे बस.

- खासगी ट्रॅव्हल्सकडून स्‍कूल बस उपलब्ध.

- खासगी ट्रॅव्हल्सकडूनही सुविधा.

अग्निशमन यंत्रणा

- २४ तासासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज.

- आपत्कालीन सेवेसाठी १०१ क्रमांक उपलब्ध.

- अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुटी रद्द करणार.

- ८५ कायम तर ४५ मानधनावरील अग्निशमन कर्मचारी कार्यरत.

- गोल्फ क्लब, डोंगरे वसतिगृहास ठक्कर डोम येथे अग्निशमन बंब.

महापालिका रुग्णालये सज्ज

- वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुटी रद्द.

- आपत्कालीन कक्ष चोवीस तास.

- ऑपरेशन थिएटर सज्ज.

- रुग्णवाहिकांची दुरुस्ती.

- रुग्णालयांमध्ये स्वच्छता.

Diwali Festival
Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीला घराला द्या सुंदर लूक, अशा पद्धतीने सजवा तुमचे घर

- आपत्कालीन सेवेसाठी टोल फ्री क्रमांक- १८००२३३४२४९

स्वच्छतेवर लक्ष

- बाजारपेठेत अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी.

- रात्रीची घंटागाडी सुरू करणार.

- कचरा विल्हेवाटीसाठी खत प्रकल्प रात्री दहापर्यंत सुरू.

- वाहतूक बेटे, रस्ते दुभाजकांची स्वच्छता.

- निवासी भागात विशेष स्वच्छता मोहीम.

उद्याने

- उद्यानांची स्वच्छता.

- खेळण्यांची दुरुस्ती.

- उद्यानांमध्ये डेकोरेशन.

- उद्याने अधिक वेळ सुरू ठेवणार.

Diwali Festival
Fraud Crime: योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्थेत गैरप्रकार; डॉ अद्वय हिरेंसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.