Diwali Ration Scheme : स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वाटप

Nilesh Aher, Manohar Bachhaw while inaugurating the distribution of 'Anandacha Shidha' for one hundred rupees to the beneficiaries from the cheap grain shop.
Nilesh Aher, Manohar Bachhaw while inaugurating the distribution of 'Anandacha Shidha' for one hundred rupees to the beneficiaries from the cheap grain shop.esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शासनाने दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात साखर, रवा, तेल व चनादाळ वाटपास सुरवात केली आहे. प्रत्येकी एक किलो असलेल्या या वस्तू शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून आजपासून वाटप सुरु झाले. (Diwali Ration Scheme Distribution of happy ration from ration shops nashik news)

पालकमंत्री दादा भुसे यांनी शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या वस्तुंचा आढावा घेतला. लाभार्थ्यांना वस्तु वेळेवर वितरीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात ४३ हजारापेक्षा अधिक तर ग्रामीण भागात ७५ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शंभर रुपयात शिधा मिळणार आहे.

शहरातील वस्तू वाटपाचा शुभारंभ अष्टविनायक कॉलनीतील स्वस्त धान्य दुकानातून करण्यात आला. माजी उपमहापौर निलेश आहेर व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शंभर रुपयात चारही वस्तुंच्या पिशव्या देण्यात आल्या. या वेळी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदार सुनील सोनवणे उपस्थित होते.

Nilesh Aher, Manohar Bachhaw while inaugurating the distribution of 'Anandacha Shidha' for one hundred rupees to the beneficiaries from the cheap grain shop.
Diwali Festival : गंगाघाटावर दिवसभर ‘फुल’ कोंडी; झेंडूच्या बाजारात लाखोंची उलाढाल

दाभाडी येथे शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो साखर, रवा, तेल, चनादाळ वाटपाचा शुभारंभ सरपंच संगीता निकम यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच निकम यांनी लाभार्थ्यांशी हितगुज साधला. दाभाडी येथील स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यता आले.

या वेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष किशोर निकम, सदस्य सुभाष नहिरे, सुरेखा मानकर, प्रशांत महाजन, हरिदादा निकम, आर. बी. निकम, किशोर बच्छाव, जयवंत पाटिल, शिवाजी निकम, राजू पाटील, रवी गोसावी, वैशाली घरटे, निर्मला निकम, राणी देवरे आदी गामस्थ उपस्थित होते.

Nilesh Aher, Manohar Bachhaw while inaugurating the distribution of 'Anandacha Shidha' for one hundred rupees to the beneficiaries from the cheap grain shop.
Diwali Shopping : कसमादे पट्ट्यात खरेदीचा उत्साह; रांगोळी, रोषणाई, सजावट, स्वच्छतेवर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.