Nashik Pomegranate News: डाळिंब करणार शेतकऱ्यांची दिवाळी गोड! किलोमागे 50 रुपयांची वाढ

Pomegranate
Pomegranate esakal
Updated on

मालेगाव : डाळिंबाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमादेत डाळिंबाचे उत्पन्न वाढू लागले आहे. देशातील पुर परिस्थिती पूर्णपणे निवळली असून कर्नाटकमधील डाळिंबाची आवक मंदावल्याने कसमादेतील डाळिंब बाजारपेठेत भाव खात आहे.

दोन महिन्याच्या तुलनेने डाळिंबास किलोमागे पन्नास रुपयाने वाढ झाली आहे. उच्च प्रतीचा डाळिंब १४० ते १६५ रुपये किलोने घाऊक दरात विकला जात आहे.

आगामी दिवाळी व छटपूजा हे सण लक्षात घेता कसमादेतील मृग बहारातील डाळिंबाला मागणी आहे. ज्यांच्याकडे चांगला प्रतीचा माल आहे. अशा शेतकऱ्यांची डाळिंबामुळे दिवाळी गोड होणार आहे. (Diwali sweet for farmers who will make pomegranate An increase of Rs 50 per kg nashik)

डाळिंबाचे भाव जुलै-ऑगस्टमध्ये घसरले होते. देशांतर्गत पुर परिस्थितीमुळे मोठ्या बाजारपेठांमध्ये डाळिंब पोचण्यास अडचणी येत होत्या. दरम्यानच्या काळात कर्नाटकमधील डाळिंब मोठ्या प्रमाणावर बाजारात येत होता.

या पाश्‍र्वभूमीवर कसमादेतील उच्च प्रतीचा डाळिंब ११० ते १२५ रुपयापर्यंत खाली आला होता. साधारण प्रतीचा डाळिंब ७० ते १०० रुपये किलोने विकला गेला.

कर्नाटकमधील डाळिंबाची आवक कमी झाली आहे. सध्या डाळिंबाने किलोला दीडशेचा दर गाठला आहे. यातच उच्च प्रतीचा डाळिंब १६५ रुपये किलोने विकला गेला.

Pomegranate
Onion News: कांद्याचे निर्यात शुल्क हटवत लागू केली MEP! टनाला 800 डॉलर; ग्राहक, व्यापारी, शेतकऱ्यांना फायदा नाही

कसमादेत मृग बहारातील डाळिंबाला सर्वत्र मागणी आहे. आगामी दिवाळी व उत्तर भारतातील छटपुजेचा सण लक्षात घेता घाऊक व्यापारी कसमादेत दाखल झाले आहेत. आठवडाभरात डाळिंब काढणीला वेग येईल.

देशांतर्गत बाजारपेठांबरोबरच या भागातील डाळिंब बांगलादेशला निर्यात केला जाणार आहे. मृग बहारातील डाळिंब बहुसंख्य शेतकऱ्यांकडे होता. बदलत्या हवामानामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तेलकट डाग असलेला डाळिंब अत्यंत कमी किमतीत विकावा लागत आहे. स्थानिक बाजारात साधारण व मध्यम प्रतीचा डाळिंब शंभर ते १२० रुपये किलोने मिळत आहे.

"डाळिंब बागेत रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रत्येक झाडाला नेट टाकले आहे. तसेच प्रत्येक फळाला पेपर लावला आहे. वेळेवर फवारणी करून बागेची निगा राखली. आठवडाभरात पीक काढणीला सुरवात होईल. उत्तर भारत व बांगलादेशमध्ये डाळिंब जाणार आहे. क्रॉप्ट कव्हरसाठी अनुदान योजना राज्यभर राबविल्यास रोगाला अटकाव बसून डाळिंबाचे उत्पन्न वाढू शकेल."

- घनश्‍याम अहिरे, डाळिंब उत्पादक, जळगाव (गा.)

Pomegranate
Pomegranate Face Packs : चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी डाळिंब आहे फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ घरगुती फेसपॅक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.