नाशिक : वयोगट कोणताही असला तरीही प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. त्यापाठोपाठ ब्लू टूथ हेडफोन्स, इयर बडस, स्मार्ट वॉच, फिटनेस बँड, साउंड बार, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, मॅकबुक खरेदी करणारा मोठा ग्राहकवर्ग आहे. कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज ऑफर, कॉम्बो पॅक, गिफ्ट व्हाउचर शिवाय कार्डवर मिळणाऱ्या सवलतींमुळे ग्राहकांचा सर्वाधिक ओढा ऑनलाइन शॉपिंगकडे अधिक वाढला आहे. खिशाला परवडतील, असे अनेक प्रकार गॅझेटमध्ये असल्याने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. (Diwali world of gadgets booming)