Doctor's Day 2021 : कोरोनायोद्धा डॉक्‍टरांसाठी लस ठरली कवच!

doctors day
doctors dayesakal
Updated on

नाशिक : गेल्‍या दीड वर्षाहून अधिक काळापासून सर्वच घटक कोरोनाविरुद्ध (corona virus) लढा देताय. पण रुग्‍णांच्‍या थेट संपर्कात येणाऱ्या डॉक्‍टरांनी (doctors) सर्वाधिक जोखीम पत्‍कारली. पहिल्‍या लाटेत राज्‍यात कोरोनाने सुमारे ७५ डॉक्‍टरांचा बळी घेतला. पण दुसऱ्या लाटेपूर्वी (corona second wave) कोरोना प्रतिबंधक लसीकरणारूपी कवच डॉक्‍टरांना उपलब्‍ध झाले. दुसऱ्या लाटेत कोरोनाने २३ डॉक्‍टरांचा बळी घेतला. तुलनेत ही संख्या घटण्याचे प्रमुख कारण लसीकरण असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. (Doctors-Day-2021-vaccine-helps-for-doctors-nashik-marathi-news)

बाधित होण्याच्‍या प्रमाणात वाढ, परंतु जीवितहानी तुलनेत कमी

देशाच्‍या पातळीवर कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित आढळण्याच्‍या बाबत राज्‍याची राष्ट्रीयस्‍तरावर चर्चा झाली. तसेच पहिल्‍या लाटेत या युद्धातील सैनिक असलेल्‍या डॉक्‍टरांच्‍या मृत्‍यूमुळेही महाराष्ट्र चर्चेत आला. परंतु लसीकरणाच्‍या पहिल्‍या टप्प्‍यात आरोग्‍य सेवकांची निवड झाल्‍याने, याचे महत्त्व राज्‍यातील डॉक्‍टरांनी जाणले. जलदगतीने स्‍वतःसह आरोग्‍य सेवक, रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले. दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांच्‍या संख्येत व मृतांच्‍या आकडेवारीत लक्षणीय वाढ झालेली असताना, डॉक्‍टरांना तुलनेत कमी फटका बसल्‍याचे आकडेवारीतून समोर येते.

पहिल्‍या लाटेत दहा टक्‍के मृत्‍यू

पहिल्‍या लाटेत मॉर्डन मेडिसीनच्‍या ७४८ डॉक्‍टरांच्‍या मृत्‍यूची नोंद इंडियन मेडिकल असोसिएशनकडे नोंदविली गेली होती. यात सुमारे ७५ डॉक्‍टर महाराष्ट्रातील होते. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण सुमारे दहा टक्‍के होते. तुलनेत दुसऱ्या लाटेत देशात ७९८ डॉक्‍टरांच्‍या मृत्‍यूची नोंद आयएमएने घेतली आहे. यात महाराष्ट्रातील २३ डॉक्‍टरांचा समावेश असून, हे प्रमाण तीन टक्क्‍यांहून कमी आहे.

कोरोनाबाधितांवर उपचाराची सर्वांत मोठी जबाबदारी असलेल्‍या डॉक्‍टरांना पहिल्‍या लाटेत मोठा दगाफटका झाला. परंतु दुसऱ्या लाटेत तुलनेत कमी हाणी पोचली. प्रतिबंधक लस हे याकरिताचे मुख्य कारण आहे. -डॉ. पंकज बंदरकर, सचिव, महाराष्ट्र आयएमए

doctors day
नाशिक महापालिकेला कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची नोटीस

कोरोनाकाळ डॉक्‍टरांसाठी अनेक पातळ्यांवर आव्‍हानात्‍मक राहिला आहे. सुरवातीला लसीकरणाबाबत खूप उलटसुलट चर्चा झाल्‍या. परंतु डॉक्‍टरांनी लशीचे महत्त्व जाणतांना स्‍वतःसह आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले. लसीकरणातून जीवितहानी टाळता येऊ शकते, हे आता तपासणीसाठी रुग्‍णांना आवर्जुन सांगितले जाते आहे. -डॉ. राजेंद्र कुलकर्णी, अध्यक्ष, कृती समिती, आयएमए महाराष्ट्र

कोरोना महामारीत सुमारे ९१ टक्‍के रुग्‍ण हे खासगी क्षेत्रातील डॉक्‍टरांनी हाताळले. त्‍यामुळे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका डॉक्‍टर व आरोग्‍यसेवकांना होता. डॉक्‍टरांना सहकार्य करणाऱ्या सर्व घटक, सामाजिक संस्‍थांचे डॉक्टर्स डेनिमित्त आभार मानतो. लसीकरण करून एकजुटीने आपण कोरोनाच्‍या संकटाला तोंड देऊ शकतो. -डॉ. समीर चंद्रात्रे, सहसचिव, आयएमए महाराष्ट्र

doctors day
अपयश झाकण्यासाठी शासनाकडून ओबीसी समाजाची दिशाभूल : आमदार फरांदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.