साहित्य संमेलनाबाबत निर्णयाची घाई करू नका - जिल्हाधिकारी मांढरे

suraj-mandhre.jpeg
suraj-mandhre.jpeg
Updated on

नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या मार्चमध्ये स्थगित करण्यात आलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याबाबत तूर्त घाई करू नये. सध्याची परिस्थिती बघता संमेलन नाकारण्याचे काही कारण नाही. मात्र, निर्णय घेताना घाई करू नका, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या आहेत. (Don't rush the decision regarding Sahitya Sammelan says Collector Mandhare)

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिलेल्या ३१ जुलैच्या अल्टिमेटमच्या पार्श्‍वभूमीवर आयोजक लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २७) जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाच्या आयोजनाबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, की राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही कोरोना नियंत्रणात येत असून, रुग्णसंख्या १०० च्या आत आहे. त्या अनुषंगाने संमेलनाच्या आयोजनाबाबत ऑगस्टअखेरपर्यंत निर्णय घेऊ नये. तोपर्यंत वाट पाहावी. निर्बंध उठल्यानंतर पुढील १५ दिवसांत कशी परिस्थिती राहते, तसेच कोरोना परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेला किती वेळ लागू शकतो, यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संमेलन होऊ शकते का, याबाबत निर्णय घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, विश्‍वास ठाकूर, प्राचार्य प्रशांत पाटील, सुभाष पाटील, संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, किरण समेळ आदी उपस्थित होते..

(Don't rush the decision regarding Sahitya Sammelan says Collector Mandhare)

suraj-mandhre.jpeg
'ओ शेऽऽऽठ'चा धुमाकूळ सुरुच! नाशिकची संगीतकार संध्या पोहचली घराघरांत
suraj-mandhre.jpeg
नाशिक : सिडको भागात टोळक्याकडून तिघांवर धारदार शस्त्राने वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.