Nashik News: शौचालयात जाताय दार उचलून ठेवा! संदर्भ रुग्णालयातील स्थिती

Dilapidated side door of toilet in reference service hospital
Dilapidated side door of toilet in reference service hospitalesakal
Updated on

Nashik News : शौचालयात जाताय दार उचलून ठेवा, अशी म्हणण्याची वेळ संदर्भ रुग्णालयातील दाखल रुग्णालयाच्या नातेवाईकांवर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील शौचालयाचे दार तुटून बाजूला पडले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा संदर्भ रुग्णालय चर्चेत आले आहे. (doors of toilets in sandarbha hospital in bad condition Nashik New)

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालय केव्हा समस्या मुक्त होईल. सांगणे अवघड झाले आहे. नेहमी कुठल्या ना कुठल्या समस्या घेऊन रुग्णालय चर्चेत राहिले आहे.

रुग्णालयातील यंत्रे नादुरुस्त असणे, रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेड उपलब्ध नाही, लिफ्टची समस्या अशा एक ना अनेक समस्यांनी संदर्भ रुग्णालय गाजलेले आहे. सध्या चर्चेचा विषय ठरले आहे, ते येथील शौचालय.

संदर्भ रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची दुरवस्था झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dilapidated side door of toilet in reference service hospital
NMC News : महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती?

विशेष म्हणजे शौचालयाचे दारच तुटून बाजूला पडले आहे. दैनंदिन अनेक नागरिक याचा वापर करत असतात. सध्या ज्यांना याचा वापर करायचा आहे. त्यांना काहीशी कसरत करावी लागत आहे.

शौचालयात गेल्यानंतर प्रथम नागरिकांना तुटून पडलेले दार उचलून आडोसा करावा लागत आहे. त्यानंतर बाहेर पडताना पुन्हा ते दार उचलून बाजूला ठेवावे लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सरकारचे एकमेव मल्टी स्पेशालिस्ट संदर्भ रुग्णालय अशी ओळख आहे.

विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्वरित शौचालयांची दुरुस्ती करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Dilapidated side door of toilet in reference service hospital
NMC News: होर्डिंगवर जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय; 150 होर्डिंगधारकांकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.