Vegetable Rate Hike : गौरी गणपतीपासून पिंपळगाव बसवंत परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनंत चर्तुदशीनंतर पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे. (Double increase in price of vegetables nashik news)
यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे बाजारपेठेत भाजीपाल्याच्या किमती दुपटी होऊन आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कोथिंबिरीची पाच रुपयांना मिळणारी जुडी ३० रुपयांपर्यंत गेली आहे. वांगी, गवार, मुळा, मेथी, भेंडी, डांगर यांच्या दरातही वाढ झाली आहे.
भाज्यांचे दर (किलोत)
वांगी ८० रुपये
गवार १२५ रुपये
शेपू २० रुपये जुडी
भेंडी ८० रुपये
शेवगा ४० ते ६० रुपये
मेथी ६० ते ८० रुपये जुडी
कारली ८० रुपये
गाजर ४० ते ६० किलो
हिरवी मिरची ८० रुपये
"पावसामुळे भाजीपाला खराब झाला आहे. यातच पितृपक्ष पंधरवड्यात भाजीपाल्याची मागणी वाढली. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत." - बाळासाहेब वायकंडे (भाजीपाल्याचे विक्रेते)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.