टोल नाक्यावर अजब प्रकार! Fastag बंदच्या नावखाली होेतेय लूट

टोल नाक्यावर अजब प्रकार! Fastag बंदच्या नावखाली होेतेय लूट
Double toll levy on toll naka dhule
Double toll levy on toll naka dhuleesakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : वाहनचालकांकडे फास्टटॅग असतांनाही धुळे शहराजवळील सोमा टोल नाक्यावर फास्टटॅग बंद असल्याचे सांगून रोखीने टोल वसूल केला जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. आणि पुन्हा फास्टटॅगवर पैसे कापले जात आहेत. असाच अनुभव आला ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील कर्मचारी आकाश कोळी यांना फास्टटॅगवर पैसे कापल्याचा मोबाईलवर मेसेज पडताच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

असा घडला प्रकार...

ताहाराबाद (ता.बागलाण) येथील वनकर्मचारी आकाश कोळी हे धुळे येथून ताहाराबादच्या दिशेने वाहन (क्र.एमएच१९,डिव्ही१५४५) प्रवास करीत असताना सोमा टोल नाक्यावर आले असता टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने फास्टटॅग बंद असून राखीने टोल भरण्याचे सांगितले. श्री. कोळी यांनी १४५ /- रूपये टोल भरला मात्र ताहाराबाद येथे पोहचताच त्यांना मोबाईल फास्टटॅगवरील टोलचे १४५/- रूपये कापल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मोबाईलवर मॅसेज पाहताच टोलनाक्यावर आपली लुट झाल्याचे निष्पन्न झाले. एकाच टोलवर एका वाहनाचे २९०/- रूपये कापल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र फास्टटॅगवर कापलेली रक्कम त्यांना अद्याप परत मिळाली नसल्याने सांगितले. अशाच प्रकारे बहुतांश वाहनचालकांकडून टोल वसुल करून लुट होत असावी असा आरोप वनकर्मचारी आकाश कोळी यांनी केला आहे.

Double toll levy on toll naka dhule
अल्फा, डेल्टानंतर नव्या व्हेरिएंटचं नाव ठरलं... WHO ची घोषणा!
Double toll levy on toll naka dhule
खूनसत्राने हादरले नाशिककर; महिनाभरात चार खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.