Shivputra Sambhaji Mahanatya: लोकाग्रहास्तव शिवपुत्र संभाजी महानाट्याचे दोन प्रयोग वाढवले : डॉ.अमोल कोल्हे

Shivputra Sambhaji Mahanatya
Shivputra Sambhaji Mahanatyaesakal
Updated on

नाशिक : शिवपुत्र संभाजी महानाट्यात सहाव्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रजासत्ताक दिनाच्या सुतीनिमित्त तिकीट अभावी प्रेक्षकांना माघारी फी रावे लागले. नाशिककरांची वाढती मागणी लक्षात घेता या महांनाट्याचे आणखी दोन प्रयोग सादर करण्यात येणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

२७ जानेवारीचां संपुर्ण प्रयोग प्रसिद्ध शैक्षणिक संस्था असलेल्या एम जी विद्यामंदिर संस्थेने घेतला असून, २८ जानेवारीच्या प्रयोगाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ कोल्हे यांनी केले. (Dr Amol Kolhe Two Experiments of Shivputra Sambhaji Mahanatya Raised by public demand nashik news)

कार्यक्रमाच्या प्रारंभी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, विशेष सरकारी वकील चंद्र पौर, सौ. चंद्रपौर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त सौ अर्चना तांबे यांचा डॉ कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शंभू राजे गुन्हेगार आहात, हा प्रसंग सांगताना दरबारात गोदावरी धावून आली. शंभू राजेवर आरोप करणारे स्वराज्य द्रोही असल्याचे सांगितले. यांचा तुम्हालाच ठार करण्याचा कट आहे. पुरावा आहे असे गोदावरीने शिवाजी राजेंना संगितले. गुन्हा घडला नसताना गुन्हेगार ठरविले जात आहे असे शभू राजे महणाले.

अखेर पुरावे सिद्ध करत शिवाजी राजेंनी दोषींना अटकेत टाकले. अन् त्यानंतर अनाजी पंतांनी माफी मागितली. हा प्रसंग बघताना सर्वच थक्क झाले. पिता शिवाजी महाराज राजे असतानाही पुराव्या शिवाय संभु राजांना निर्दोष सोडले नाही.

असे अनेक प्रसंग, अनजी पंत यांचे कुट करस्थान, मूगलांना दिलेली फुटीर वाद्यानी अन् घरभेद्यानी दिलेली साथ, संभु राजे यांची चतुर निती, त्यांना मावळ्यांनी दिलेली अनमोल साथ, शिवाजी महाराज यांचा मृत्यूनंतर शंभू राजे यांनी व्यक्त केलेली भावना अखेरचे दर्शन मिळाले नाही.

ही व्यक्त केलेली खंत, त्यानंतर शंभू राजांना तत्काळ कैद करणार, त्यानंतर आनाजी पंतांना झालेली अटक, संभाजी पेक्षा स्वराज्य मोठे आहे, मामासाहेब, हंबिरराव यांची भूमिका असे एकाहून एक प्रसंग अंगावर रोमांच आणणारे ठरले. विविध एतीहासिक एकाहून एक प्रसंगांनी उपस्थितानी लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Shivputra Sambhaji Mahanatya
Saptashrung Gad : श्री अन्नपूर्णा प्रसादालयातील स्वयंपाकगृह इपॉक्सी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाले अद्यावत!

नगरसूलचे यवा लघुउदयोजक कॉफीडरेशन इंडिया इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष संजिव शिवाजी पैठणकर, रूपाली आणि अनुसया पैठणकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सुरेंद्र भोई, लेखक - अभिनेता श्रीपाद देशपांडे , रंग माझा वेगळा मधील अभिनेत्री अनघा अतुल, किरण भालेराव , प्रसिद्ध गायक संजय गीते, कार्यकारी निर्माता अमित कुलकर्णी, निर्मिती व्यवस्थापन मालिका राहुल रायकर, अभिनेत्री - लेखिका -दिग्दर्शिका अपर्णा क्षेमकल्याणी, लेखक निषाद वाघ यांचाही सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन योगेश कमोद यांनी केले.

शस्त्र पूजा संजीव पैठणकर , रुपाली पैठणकर यांनी केले . अश्व पूजन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त सौ अर्चना तांबे यांनी केले.

"पोलीस रस्त्यावर आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे २ हजार पोलिसांना पोलीस वेल्फेअर माध्यमातून हे नाट्य बघितले. त्याबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आभार मानले. आदिवासी आश्रम शाळेतील ३०० विद्यार्थ्यानी गुरुवारचा प्रयोग बघितला. सहा दिवस उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल नाशिककरांचे आभार मानतो. २८ जानेवारीच्या प्रयोगाचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा." - खा.अमोल कोल्हे

Shivputra Sambhaji Mahanatya
Khelo India National Tournament : खो-खो स्पर्धेसाठी वृषाली भोये अन् निशा वैजल यांची निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()