Nashik News : जिल्हा परिषदेचे भाजपचे माजी गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे य़ांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
चांदवड तालुक्यातील डॉ. कुंभार्डेंच्या बहुतांश प्रमुख समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यशैलीला पसंती देत शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय पटलावर भुकंपच झाला आहे. (Dr Atmaram Kumbharde supporters enter into Shiv Sena nashik political news)
डॉ.आत्माराम कुंभार्डेंचे कट्टर समर्थक इंदुमती बहु उद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे, बाजार समितीचे माजी संचालक निवृत्ती (फौजीनाना ) घुले, दत्ताआबा गांगुर्डे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे यांचा व त्यांच्या समवेत विविध पक्षांतुन आलेल्या चांदवड तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच व सदस्य,
वि.का.सह.सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व इतर संस्थांचे पदाधिकारी विशेषतः डॉ आत्माराम कुंभार्डे यांच्या समर्थकांनी म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
अनिताताई जाधव (सरपंच, धोडंबे), श्रीराम जाधव (युवानेते, पुरी), भागवत कचरु जाधव (मा. चेअरमन, कृ. उ. बाजार स. चांदवड), बबनराव पुरकर (मा. संचालक, कादवा कारखाना), राजाभाऊ नलगे (चेअरमन, सोसायटी, आडगांव), नवनाथ दत्तात्रेय धनाईत (चेअरमन, एकरुखे सोसा.), जाधव वसंत गोविंद ( व्हा.चेअरमन, एकरुखे सोसा.), रावसाहेब यशवंत गांगुर्डे (ग्रा.पं.सदस्य, दिघवद ), भाऊसाहेब मधुकर भुजाडे (कन्हेरवाडी), लताबाई निवृत्ती घुले (सरपंच, आडगांव), निर्मला शामसिंग परदेशी (सरपंच, हट्टी),
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
माणिक भिमसिंह परदेशी (उपसरपंच, हट्टी), निवृत्ती गोविंद जाधव (मा. चेअरमन, एकरुखे सोसा.), बबनराव पिंपरकर (मा.सरपंच, जोपुळ) श्री. निवृत्ती जाधव (कानमंडाळे), भुषण काळे (रेडगांव), कल्पना सुरेश ठाकरे (सरपंच, काजी सांगवी),
नवनाथ एंडाईत ( व्हा. चेअरमन, आडगाव), एकबाल पटेल (गनुर), वसंतराव संतु आहेर (व्हा. चेअरमन, सोसा. वडाळीभोई), बाबुराव गांगुर्डे (चेअरमन, सोग्रस सोसायटी) , आनंदा इंद्रभान मंडलिक (वाहेगांव साळ, सोसा. संचालक), मोकाट दिलीप बाबुराव (संचालक, शिवरे सोसा.) ,
प्रकाश म्हसु धनाईत (मा.चेअरमन, एकरुखे सोसा.), भुजाडे शहाजी रघुनाथ (संचालक, एकरुखे सोसा.) श्री. राजेंद्र वसंतराव भुजाडे (सामाजिक कार्यकर्ते, कन्हेरवाडी), हिरामण चौधरी (निंबाळे), दामु चंदर पवार (मा. उपसरपंच, पिंपळणारे । ग्रा.पं.सदस्य), नितीन मुरलीधर आहेर (संचालक, काजीसांगवी सोसायटी) , तुकाराम गाढे (उपसरपंच, आडगाव), दिनकर भड (चिखलआंबे)
डॉ. आत्माराम कुंभार्डेंच्या प्रमुख समर्थकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी काळात चांदवड तालुक्यातील राजकीय गणितं बदलतील. या राजकीय भुकंपाची चाहूल बाजार समितीच्या निवडणुकीतच लागली होती.
विकास भुजाडेंसह बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या पदाधिकार्यांनी तेव्हापासूनच शिवसेना प्रवेशाची चाचपणी सुरू केली होती. या राजकीय भुकंपाचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसह विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होतील.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत व हिंदुत्वाशी तडजोड न करता त्यांनी हाती घेतलेला भगवा व शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्यातील विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहे." - विकास भुजाडे, डॉ.कुंभार्डे समर्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.