Nashik News : नाशिक रोड येथील श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या सोनोग्राफी मशिन सापडल्याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यावर प्रशासनाकडून दोषारोप ठेवताना या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असतानाच त्यांच्याकडे पुन्हा वैद्यकीय अधिक्षक या महत्त्वपूर्ण पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.
नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे नियमित आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. (Dr Bhandari Charge of post of Medical Superintendent in nmc nashik news)
ते रुजू होण्यापूर्वीच वादग्रस्त भंडारी यांच्याकडे अधिक्षक पदाचा कार्यभार सोपविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिका क्षेत्रात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कारवाईची जबाबदारी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असताना महापालिकेचेच वैद्यकीय अधिकारी व बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन आढळून आले.
नाशिक रोड येथील देवळाली गाव परिसरात श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत अनधिकृत सोनोग्राफी मशिन आढळले होते.
सदर रुग्णालयाची इमारत ही डॉ. भंडारी यांच्या मालकीची असून अनधिकृतपणे त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होते. त्यामुळे महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशिनसह रुग्णालय सील केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर या प्रकरणात डॉ. भंडारी दांपत्यासह ९ डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नाशिक रोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वैद्यकीय विभागाने डॉ. भंडारी हे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रशासन उपायुक्तांकडे दाखल करण्यात आला.
डॉ. भंडारी यांच्या कृतीमुळे नागरिकांमध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन करणे, महापालिकेच्या सेवेत असतानाही खासगी व्यवसाय करणे आणि अवैधरीत्या सोनोग्राफी मशिन बाळगणे असे तीन आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
याप्रकरणी चौकशी प्रलंबित असतानाच डॉ. भंडारी यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची नगर येथे बदली झाल्याने रिक्त पदावर डॉ. भंडारी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
सक्षम अधिकारी असताना नियुक्ती
डॉ. अशोक करंजकर हे महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहे. सोमवारी (ता. २४) पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याने त्यापूर्वीच प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी डॉ. राजेंद्र मंगतराम भंडारी यांची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक या पदावर शासन नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवशक्यता आहे.
शासनाकडून अधिकारी नियुक्त न केल्यास महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सिनिअर अधिकाऱ्याकडे या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी देणे अपेक्षित आहे. त्यासाठी डॉ. नितीन रावते हे सीनियर लिस्टमध्ये वरच्या स्थानावर आहे. असे असताना डॉ. भंडारी यांच्याकडे पदभार दिल्याने वैद्यकीय विभाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.