पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : तुमच्या आशीर्वादामुळेच खासदार व आता मंत्री होऊ शकले. तुमच्या ऋणात सदैव राहणार असून, विकासकामातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे. ऊस उत्पादकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा निफाड ड्रायपोर्टचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (dr bharati pawar) यांनी मंगळवारी (ता. १७) येथे दिली.
मंत्री डॉ. भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Aashirwad Yatra) पिंपळगाव बसवंतमध्ये पोचली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. भाजपचे नेते सतीश मोरे, बापूसाहेब पाटील प्रमुख पाहुणे होते.
मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, की मंत्रिपद मतदारसंघाच्या विकासासाठी पणाला लावणार आहे. निफाडचे ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच हा स्वप्नवत राजकीय प्रवास घडला. भविष्यात आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.
सतीश मोरे म्हणाले, की मंत्रिपदावर पोचल्यानंतर डॉ. पवार यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून भविष्यातील विकासाची झलक दाखवून दिली आहे. बापूसाहेब पाटील यांनी नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचे नमूद केले.
जल्लोषात स्वागत…
नियोजित वेळपेक्षा तीन तास उशिरा मंत्री डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आगमन झाले. मतदारसंघाला पहिल्यादाच मंत्रिपदाचा मान मिळाल्याने नागरिक व भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. बस आगारापासून सजविलेल्या चित्ररथात डॉ. पवार उभ्या राहून बाजारपेठेतील नागरिकांना अभिवादन करीत होत्या. भव्य होर्ल्डिंग शहरात उभारले होते. निफाड फाट्यावर डॉ. पवार यांचे आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला. उपस्थित गर्दीचा उत्साह, जल्लोषात स्वागत पाहून डॉ. पवार भारावून गेल्या. डॉ. पवार यांच्या तासाभराच्या दौऱ्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये बारा हत्तींचे बळ आलेले दिसले.
भागवत बोरस्ते, वैकुंठ पाटील, गोविंद कुशारे, चिंधू काळे, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, डॉ. अरुण गचाले, प्रकाश घोडके, एल. के. मोरे, चेतन मोरे, संदीप झुटे, कुसुम निळकंठ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.