केंद्रीय मंत्री भारती पवारांना धक्का; दिंडोरीत शिवसेना

आपल्याच मतदार संघात केंद्रीय मंत्री भारती पवारांना धक्का, शिवसेनेची बाजी
Dindori Nagar Panchayat Election Result Updates
Dindori Nagar Panchayat Election Result Updatesesakal
Updated on

नाशिक : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharati pawar) यांना आपल्याच मतदार संघात जोरदार धक्का बसला आहे. दिंडोरी नगरपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाली असून आता पूर्ण निकाल हाती आला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना (Shivsena) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. (Dindori Nagar Panchayat Election Result Updates)

त्यामुळे भारती पवारांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. . तर भाजपला ( BJP) केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, भारती पवार यांनी नाराजीतून 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली. याच जोरावर भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपचे पाठबळ मिळाल्याने भारती पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करत स्वत:चे स्थान आणखी भक्कम केले. मात्र, या निवडणुकीच्या निकालाने त्यांना धक्का बसला आहे.

Dindori Nagar Panchayat Election Result Updates
Nagar Panchayat Election: नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष

सहा जागा शिवसेनेने पटकावल्या

तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या सून आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही डॉ. भारती पवार यांनी लाखांच्या घरात मते मिळवली होती. नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते.तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणाऱ्या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

– एकूण जागा – 17

– शिवसेना – 6

– राष्ट्रवादी – 5

– भाजप – 4

– काँग्रेस – 2

– इतर(अपक्ष) – 00

Dindori Nagar Panchayat Election Result Updates
कर्जतमध्ये रोहित पवारांची बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.