Dr. Bharati Pawar : राज्य सरकारने घ्यावा मास्कबाबत निर्णय : डॉ. भारती पवार

Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawaresakal
Updated on

नाशिक : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात असून, केंद्र सरकारतर्फे संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Dr Bharati Pawar statement state government should take decision regarding masks nashik news)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Dr Bharti Pawar
Water Scarcity : धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा; आवळखेड परिसरात पाणीटंचाई

नाशिक जिल्ह्यात सध्या ९०पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सौ. पवार यांनी मंगळवारी (ता. ४) जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला. त्या म्हणाल्या, की कोरोनाचा नवा विषाणू आहे का, याबाबत सर्वेक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा. गेलाच तर मास्क लावून जावे, असे आवाहन करतानाच मास्कबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात यापूर्वी मुंबई आणि मालेगावमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट बघावयास मिळाले होते.

पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाय योजना राबविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या वेळी त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचा साठा, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या, लसीकरण आणि बेडची व्यवस्था याबाबतचा आढावा घेतला.

Dr Bharti Pawar
Narhari Zirwal : कलावंतांनी संघटित होणे काळाची गरज : नरहरी झिरवाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.