Dr. Bharati Pawar : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जागृत व्हा : डॉ. भारती पवार

While guiding the Bhoomi Puja of the regional hospital building, Dr. Bharti Pawar
While guiding the Bhoomi Puja of the regional hospital building, Dr. Bharti Pawaresakal
Updated on

Dr. Bharati Pawar : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.

अभोणा (ता. कळवण) येथील ग्रामीण रुग्णालयात केंद्र सरकारच्या भरीव निधीतून ५० खाटांच्या नवीन क्षेत्रीय रूग्णालय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. (Dr Bharati Pawar statement Wake up to take advantage of government schemes nashik news)

डॉ. पवार म्हणाल्या की, शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी व औषधोपचार होतात. तसेच टेलिकन्सल्टेशनची व्यवस्था झाली आहे. रुग्णास हेल्थ फाइलच्या माध्यमातून देशात कुठेही उपचार घेण्याची व्यवस्था होणार आहे. यापुढे रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना इतर रुग्णालयात पाठविले जाणार नाही. त्यांना आवश्‍यक त्या सुविधा याठिकाणी मिळतील.

महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड त्वरित उपलब्ध करू देऊन, ग्रामीण भागात सिकलसेलचे शिबिर घ्यावे. द्वेषाचे राजकारण न करता सर्वानी समाजहिताची कामे करावीत असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, हरिश्चंद्र देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या विविध आरोग्य सुविधांची माहिती दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

While guiding the Bhoomi Puja of the regional hospital building, Dr. Bharti Pawar
MTDC Fellowship : पर्यटन क्षेत्रात तरुणांना फेलोशिपची संधी! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

सूत्रसंचालन किशोर पगार यांनी केले. डॉ.अनंत पगार यांनी आभार मानले. मुस्लिम पंच कमेटीतर्फे ना.डॉ.भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसोबत त्यांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला.

याप्रसंगी नंदकुमार खैरनार, दीपक खैरनार, सुधाकर पगार, निंबाजी पगार, गोविंद कोठावदे, सुनीता पवार, एस.के.पगार, कृष्णकुमार कामळस्कर, सुनील खैरनार, संजय सावकार, अनिल महाजन, दीपक वेढणे, रमेश शहा, हरिकाका सोनजे,

अप्पा ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहते, डॉ.दीपक बहिरम, डॉ.पुरुषोत्तम खंबाईत, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अभोणा ग्रामीण रूग्णालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

While guiding the Bhoomi Puja of the regional hospital building, Dr. Bharti Pawar
Nandurbar Market Committee : चुरस वाढल्याने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; राजकीय हालचालींना वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()