विमानसेवेच्या माध्यमातून Nashik आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडणार : डॉ. भारती पवार

bharati pawar latest marathi news
bharati pawar latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : ओझर (नाशिक) विमानतळ येथून स्पाइस जेट (Spice Jet) या कंपनीच्या माध्यमातून नाशिक-हैदराबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचेरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा (Air service) पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

या विमान सेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया (Jyotiraditya scindia) यांनी यास मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (dr bharatitai pawar) यांनी दिली. (dr bharati tai pawar statement about Nashik Delhi flight service restored from August 4 nashik latest marathi news)

कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे लॉकडाऊनपूर्वी थेट नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्याने स्पाइस जेटमार्फत ही सेवा आठवड्याचे सातही दिवस चालू होती. कोरोना कालावधीत ही विमानसेवा खंडित झाली होती.

नाशिक-दिल्ली विमान सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार नागरी विमान वाहतूक विभागाने बोइंग ७३७ मॅक्सला परवानगी दिली असून स्पाइस जेटला देखील नाशिक-दिल्ली विमानसेवा दररोज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

bharati pawar latest marathi news
2 आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद : भगवान करनकाळ

४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नाशिक-नवी दिल्ली विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता ही सेवा दुपारऐवजी सायंकाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विमानसेवेचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे. तसेच नाशिक (ओझर) विमानतळाचा पीपीपी मोडवर विकास करावा. नाशिक (ओझर) विमानतळ मुंबईच्या जवळ असल्याने येथे कार्गो, नाईट लँडिंग आणि नाईट पार्किंगसाठी हब बनवण्याची मागणी करण्यात आली असून त्‍यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीयमंत्री श्री. सिंदिया यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

विमानसेवेच्या वेळेत बदल

चार ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या दिल्ली नाशिक हवाई सेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिल्लीहून सकाळी सात वाजून ५६ मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. ओझरच्या विमानतळावर सकाळी पावणेदहा वाजता आगमन होईल. दहा वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण झाल्यानंतर दुपारी बारा वाजून १५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोहचेल.

bharati pawar latest marathi news
अमरिशभाई, अग्रवालांचीच फाईल ‘पेंडिंग’; सर्वसामान्यांचे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.