Nashik ZP News : जि. प. आरोग्य विभागात अनुभव पत्रासाठी कसरत! 3 हजार रुपयांचा रेट सुरू असल्याची चर्चा

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये विहित नमुन्यात अनुभव प्रमाणपत्र वरिष्ठांच्या लेटरहेडवर लावणे अनिवार्य केले आहे.
dr bharti statement of ZP Exercise for Experience Letter in Health Department nashik news
dr bharti statement of ZP Exercise for Experience Letter in Health Department nashik news esakal
Updated on

Nashik ZP News : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये विहित नमुन्यात अनुभव प्रमाणपत्र वरिष्ठांच्या लेटरहेडवर लावणे अनिवार्य केले आहे.

मात्र, हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू असून, त्यासाठी तीन हजार रुपयांचा रेट सुरू असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आहे. (dr bharti statement of ZP Exercise for Experience Letter in Health Department nashik news )

शासनाच्या आरोग्य विभागात तब्बल दहा ते बारा वर्षांनंतर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरतीप्रक्रिया होत आहे. यामध्ये एमबीबीएसच्या उमेदवारांसाठी एक हजार ४४६ जागा, तर बीएएमएसच्या उमेदवारांसाठी २८३ जागा आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही भरतीप्रक्रिया राबविली जात आहे.

जाहिरातीमध्ये परीक्षेपेक्षा समुपदेशनाने निवड होणार असल्याने सर्वच स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणत्याही शासकीय यंत्रणेत काम केल्याचा अनुभव विहित नमुन्यात आणि वरिष्ठांच्या लेटरहेडवर देणे बंधनकारक केले आहे.

dr bharti statement of ZP Exercise for Experience Letter in Health Department nashik news
Nashik ZP News : कामे उरकण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली; निधी वेळात खर्च करण्याचे निर्देश

त्यामुळे सर्वच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ते घ्यायला येत आहेत. मात्र यामध्ये सुसूत्रता नसल्याने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जागेवर नसल्याने या उमेदवारांचे हाल होत आहेत. शेकडो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रोज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्वतःचे प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून चकरा मारत आहेत. मात्र त्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत.

तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे कोरे लेटरहेड सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळणार का? असा प्रश्न समोर येत आहे. ५० ते ६० रुग्णांची ओपीडी सोडून वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात यावे लागत आहे. हे प्रकरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे लेटरहेड बाहेर पाठविणाऱ्या कर्मचाऱ्याला सुनावल्याचे समोर आले आहे.

''हा प्रकार गंभीर आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंगल विंडो सिस्टिमद्वारे हे अनुभव प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.''- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

dr bharti statement of ZP Exercise for Experience Letter in Health Department nashik news
Nashik ZP News : जि. प. अभियंता पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.