जुने नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. शहरातील दिव्यांगांची प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मोठी फरपट होत आहे. नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात केंद्र स्थलांतरित केले असल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे. (Dr Disability certificate distribution center in Hussain Hospital closed for 3 years Nashik News)
अपंगत्व सिद्ध करणारे शासकीय प्रमाणपत्राची अनेक ठिकाणी मागणी केली जाते. शहरातील दिव्यांगांसाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथे, तर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी जिल्हा रुग्णालय येथे विशेष केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. या ठिकाणी शासकीय डॉक्टरांकडून दिव्यांगांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात होते.
प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी गेलेल्या दिव्यांगांना प्रथम फेरीत कधीही प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. विविध कारणांसाठी त्यांना वारंवार केंद्राचे हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. दोन्ही केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने दिव्यांगांना वाहन व्यवस्था उपलब्ध होत असल्याने काहीसा त्रास कमी जाणवत होता.
२०१९ पासून आजपर्यंत डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र बंद आहे. कोविड सेंटर असल्यामुळे येथील केंद्र बिटको रुग्णालयात स्थलांतरित केले असल्याचे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावाची स्थिती सामान्य आहे. या रुग्णालयात एकही कोविड रुग्ण नाही.
अशा वेळेस परिस्थिती सामान्य होताच येथील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र पुन्हा कार्यान्वित होणे आवश्यक होते. तसे झाले नसल्याने शहरातील दिव्यांगांना प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बिटको रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्या ठिकाणी ही वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.
प्रमाणपत्रासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. दिव्यागांची होणारी फरपट थांबवण्यासाठी पुन्हा केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे.
"शहराच्या मध्यवर्ती भागातील केंद्र दुसऱ्या टोकाला अर्थात बिटको रुग्णालयात स्थलांतरित केल्याने दिव्यांगांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय ज्या दिव्यांगांचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी आहे. त्यांचे अधिक टक्क्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र द्यावे."
- जुबेर हाश्मी, रुग्णालय समितीचे सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.