Dhangar Reserervation : आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देणारच नाही, ते इतके... : डॉ. गावित

Dr Gavit statement  Dhangars will not be given reservation among tribals nashik news
Dr Gavit statement Dhangars will not be given reservation among tribals nashik newsesakal
Updated on

Dhangar Reserervation : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांबरोबरच आमदार-खासदारदेखील धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत. आमदार नरहरी झिरवाळ यांनी २५ आदिवासी आमदार राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावितही आक्रमक झाले आहेत.

डॉ. पवार यांनीही झिरवाळ यांच्या मागणीला दुजोरा देत वेळ पडल्यास आम्हीही पदाचा त्याग करू, असे सुतोवाच केले आहे. ‘माझी गरज माझ्या समाजाला होणार नसेल, तर पदाला अर्थच नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देणारच नाही, ते इतके सोपे नाही, असेही डॉ. गावित यांनी सांगितले. (Dr Gavit statement Dhangars will not be given reservation among tribals nashik news)

समाजासाठी पदाचा त्याग करू : डॉ. भारती पवार

आदिवासींमधून आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाजातर्फे उपोषण करण्यात आले. त्यावर आदिवासी समाज आक्रमक झाला असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यातच विविध संघटनांनी एकत्र येत विधानसभेचे उपाध्यक्ष आदिवासी आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह हिरामण खोसकर, जे. पी. गावित आदींनी एकत्र येत गुरुवारी नाशिकमध्ये विराट मोर्चा काढला.

या वेळी उपाध्यक्ष झिरवाळ यांनी धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देऊ नये; अन्यथा आम्ही सगळे आमदार राजीनामा देऊ, असा इशारा दिला. शुक्रवारी (ता. १३) याप्रश्नी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारही आक्रमक झाल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, की लोकप्रतिनिधी म्हणून आदिवासी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सर्व जण एकत्र आहोत. दिल्लीतही आमच्या खासदारांची बैठक झाली होती.

आमदार आणि खासदार आमचे एकच मत आहे. आदिवासी समाजाची प्रगती होण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण द्यावे. आमच्या समाजामुळे आमची ओळख आहे. माझी गरज माझ्या समाजाला होणार नसेल, तर पदाला अर्थच नाही. वेळ आली, तर आम्ही समाजासाठी पदाचाही त्याग करू, असा इशारा डॉ. पवार यांनी दिला.

Dr Gavit statement  Dhangars will not be given reservation among tribals nashik news
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण मिळणार? 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी; पडळकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

कुठल्याही समाजाचा समावेश आदिवासींमध्ये होणार नाही : डॉ. गावित

आदिवासींच्या आरक्षणात धनगरांना आरक्षण देता येणार नाही, असे मी यापूर्वीच अनेकदा जाहीर केले आहे. कुठल्याही समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करणार नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मी स्पष्टपणे सांगितले आहे, की कुठल्याही समाजाचा समावेश आदिवासींमध्ये होणार नाही. हे इतके सोपे नाही. धनगरांना आरक्षण देणे शक्यही होणार नाही. आरक्षणाची आम्ही कुठेही शिफारस वगैरे केलेली नाही. आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे मोर्चा कशासाठी काढण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण, ओबीसी, आदिवासी किंवा धनगर असेल. सर्व सत्तेत आहेत तरी मोर्चे काढतातच आहे, यात नवीन काही नाही. मोर्चे काढले म्हणजे त्यांना वाटते, की जे चालले ते बंद होईल. त्यामुळे ते करत असतात. त्याने फारसा काही फरक पडणार नसल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

आदिवासी नेत्यांची विसंगत भूमिका का, असा प्रश्न विचारला असता मंत्री डॉ. गावित यांनी जी गोष्ट होणारच नाही, त्याबाबत पुढच्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नसल्याचे सांगितले. आदिवासी समाजाचे अर्थसंकल्पात बजेट दोन टक्क्यांनी कमी केले. मात्र, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने दोन टक्के निधी देण्याचे मान्य केले असून, डिसेंबरअखेर हा निधी प्राप्त होईल. विभागाने निधी वेळात खर्च करावा, असे नियोजन सुरू असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

Dr Gavit statement  Dhangars will not be given reservation among tribals nashik news
Dhangar Reservation : आरक्षण नाही तो पर्यंत मतदान नाही, धनगर समाजाचा निर्धार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.