Nashik: डॉ. कोतवाल दांपत्याने फुलविले नंदिनीचे जीवनगीत! मानसकन्येचा मुलीसारखा सांभाळ करीत दिला जीवनाला आकार

While Kanyadan the daughter of Manas, Dr. Sandeep and Dr. Ashwini Kotwal.
While Kanyadan the daughter of Manas, Dr. Sandeep and Dr. Ashwini Kotwal.esakal
Updated on

Nashik News : रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल, प्रेमाचं नातं एखाद्याच नशीब बदलून टाकत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोजीरोटीसाठी मोलमजुरी करीत मुलीचे उच्च शिक्षण व सुखी संसाराचे स्वप्न पहाणाऱ्या टाके देवगाव (ता.त्र्यंबकेश्वर) येथील चंदा शंकर लामटे (कोळी) व सौ. अलका चंदा लामटे या दाम्पत्याच्या नंदिनीच्या लग्नाची कहाणी अशीच काहिशी प्रेमाच्या नात्यावर आधारित आहे.

काही नाती आपल्याला अचानक भेटतात व कळत नकळत आपण त्या नात्यांमध्ये बांधलो जातो. बांधलेल्या नात्यामधली मनं जपतो, अशाच एका नाती जपण्याचा अनोखा आदर्श घालून दिला तो सटाणा येथील देवरे- व नाशिकच्या कोतवाल परिवाराने. (Dr Kotwal couple Taking care of adopted girl nandini like daughter gave shape to her married life Nashik)

येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त रमेश देवरे यांची कन्या डॉ. सौ. अश्‍विनी कोतवाल व त्यांचे जावई डॉ. संदीप कोतवाल हे दाम्पत्य नाशिकला वैद्यकीय व्यवसायात आहेत.

त्यांचे सहा महिन्यांचे बाळ मुद्रा हिचा सांभाळ करण्यासाठी एका सालस प्रेमळ मुलीच्या, 'आया' म्हणून ते शोधात होते. नाशिकच्या द्वारका परिसरातील लाकडाच्या वखारीत कामाला असलेल्या एका माणसाने त्यांची टाकेदेवगाव येथील भाची या कामासाठी येऊ शकेल असे त्यांना सुचविले.

२०१२ मध्ये कोतवाल कुटुंबीयांनी टाके देवगाव येथे जाऊन नंदिनीची व तिच्या आई वडिलांची भेट घेऊन चर्चा केली. आदिवासी विभागाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या नंदिनीला मानसकन्या मानून मुद्राचा सांभाळ करण्यासाठी ते तिला नाशिकला आपल्या निवासस्थानी घेऊन आले.

वैद्यकीय व्यवसायात असल्याने कामाच्या व्यापात सहा महिन्यांच्या मुद्रा हिचा सांभाळ कसा करावा या चिंतेत असणाऱ्या जोडप्यास प्रामाणिक मानसकन्या मिळाल्याने ते आनंदी झाले. मुद्रा सोबतच नंदिनीला देखील एक अपत्य समजूनच ते तिची काळजी घेऊ लागले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While Kanyadan the daughter of Manas, Dr. Sandeep and Dr. Ashwini Kotwal.
PSI Success Story : गरीबीवर मात करून कुटुंबाचा गाडा हाकता हाकता पतीच्या पाठिंब्यातून अनिता बनली पोलिस उपनिरीक्षक

नंदिनी कोतवाल कुटुंबातील एक सदस्य झाल्याने तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नंदीनीला पंचवटी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मृदाला सांभाळता सांभाळता नंदिनीने एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नाशिकमध्येच डॉ. कोतवालांनी त्यांच्या ओळखीच्या एका चार्टर्ड अकाउंटच्या ऑफिसमध्ये नंदिनीला चांगल्या पगारावर नोकरीस लावून दिले. लग्नाचे वय झाल्याने त्यांनी तिच्यासाठी वर संशोधन सुरू केले.

एस. टी. महामंडळात नोकरीस असलेल्या योगेशशी नंदिनीचा विवाह जुळला. नुकताच नाशिक येथे एका मंगल कार्यालयात योगेश व नंदिनीचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला. लग्नाचा खर्च पेलण्याबरोबरच नंदिनीचे कन्यादानही कोतवाल दांपत्याने केले.

संसारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संसारोपयोगी वस्तू, इतर साहित्य, किराणा माल, भेटवस्तू देऊन कोतवाल दांपत्याने नंदिनीची बिदाई केली.

While Kanyadan the daughter of Manas, Dr. Sandeep and Dr. Ashwini Kotwal.
Success Story : MPSC त बंजारा समाजातील मुलीने एकाच वेळी मिळवली दोन पदे! अद्याप कविताच्या घरापर्यंत वीज, पाणी नाहीच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.