Nashik News: शल्‍यचिकित्‍सकांना अद्ययावत प्रशिक्षण, सामाजिक जाणिवेतून उपक्रमांचे आयोजन : डॉ. महेश मालू

राष्ट्रीयस्‍तरावर असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडिया या शल्‍यचिकित्‍सकांच्‍या संघटनेशी संलग्‍न महाराष्ट्र राज्य स्‍तरावर महाराष्ट्र स्‍टेट चॅप्‍टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडिया (मासी) ही संघटना कार्यरत आहे.
dr mahesh malu
dr mahesh malu esakal
Updated on

नाशिक : आरोग्‍य व्‍यवस्‍थेमध्ये शल्‍यचिकित्‍सक अत्‍यंत महत्त्वाचा घटक आहेत. त्‍यामुळे त्‍यांना अद्ययावत कौशल्‍ये, तंत्रज्ञान माहीत असावे, याअनुषंगाने सातत्‍याने कार्यशाळा, परिसंवादांचे आयोजन केले जाईल. त्‍यांचे आरोग्‍य सुदृढ ठेवण्यासंदर्भातदेखील उपक्रमांची आखणी केली जाईल.

दुसरीकडे सामाजिक जबाबदारीतून जनजागृती कार्यक्रम राबवत रुग्‍ण व डॉक्‍टर यांच्‍यात सुसंवाद घडविण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची भूमिका महाराष्ट्र स्‍टेट चॅप्‍टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडिया (मासी)चे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. महेश मालू यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केली. (dr mahesh malu Accepted responsibility of vice president of Maharashtra State Chapter of Association of Surgeons of India nashik news)

राष्ट्रीयस्‍तरावर असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडिया या शल्‍यचिकित्‍सकांच्‍या संघटनेशी संलग्‍न महाराष्ट्र राज्य स्‍तरावर महाराष्ट्र स्‍टेट चॅप्‍टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडिया (मासी) ही संघटना कार्यरत आहे.

नुकताच नाशिक सर्जिकल सोसायटीच्‍या सहकार्याने पार पडलेल्‍या राज्‍यस्‍तरीय परिषदेत २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी ‘मासी’च्‍या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये नाशिकचे डॉ. मालू यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

या नियुक्‍तीनंतर संवाद साधताना डॉ. मालू म्‍हणाले, की उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना घेतलेल्‍या अनुभवांचा उपयोग पुढील वर्षी २०२५-२६ मध्ये ‘मासी’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना नक्‍की होईल.

राष्ट्रीय पातळीवर संघटनेचे पन्नास हजार सदस्‍य असून, ‘मासी’ची सदस्‍यसंख्या सुमारे पाच हजार आहे. राज्‍यातील पन्नास वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्‍युत्तरच्‍या विद्यार्थ्यांनादेखील संघटनेतर्फे मार्गदर्शन केले जाते.

आपल्‍या कार्यकाळात ‘हॅन्डऑन’ स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यावर भर असेल. तसेच सदस्‍य डॉक्‍टरांसाठी राज्‍य, विभागीय पातळीवर विविध कार्यशाळा, परिषदांतून त्‍यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यास प्राधान्‍य दिले जाणार आहे.

विशेषतः सध्याच्‍या तंत्रज्ञानाच्‍या युगात बदलांची माहिती डॉक्‍टरांपर्यंत पोचविली जाईल. परिणामी, रुग्‍णांना आधुनिक स्वरूपाच्या आरोग्‍य सुविधा मिळू शकतील, असे डॉ. मालू यांनी सांगितले.

dr mahesh malu
NMC News : नाशिक महापालिकेकडून अंदाजपत्रक मंजुरीसाठी उद्या विशेष महासभा

सदस्‍यांच्‍या आरोग्‍याची घेणार काळजी

डॉ. मालू म्‍हणाले, की सद्यःस्थितीत कामाच्‍या दगदगीत अनेकांकडून आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते. डॉक्‍टरदेखील यास अपवाद नाहीत. त्‍यामुळे रुग्‍णेसेवेत योगदान देणाऱ्या डॉक्‍टर सदस्‍यांच्‍या सुदृढ आरोग्‍यासाठी विविध उपक्रम राबविणार आहे.

यात प्रामुख्याने पुण्यात राज्‍यस्‍तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजनासह इतर उपक्रमांचा समावेश असेल. तसेच संघटनेतर्फे राबविलेल्‍या जाणाऱ्या ‘सोशल सेक्‍युरिटी स्‍कीम’साठी जास्‍तीत जास्‍त डॉक्‍टरांची नोंदणी करून घेण्यावर भर राहील, असे त्‍यांनी सांगितले.

संघटन नेतृत्वाचा प्रदीर्घ अनुभव

नुकतीच राज्‍यस्‍तरीय परिषद नाशिकला पार पडली. चौथ्यांदा या परिषदेचे नाशिकला आयोजन केले होते. यापूर्वी १९९४ मध्ये डॉ. सुभाष सुराणा यांच्‍या नेतृत्‍वाखाली, २००२ मध्ये डॉ. वसंतराव पवार, २०१३ मध्ये डॉ. प्रमोद शिंदे हे आयोजन समिती सचिव होते.

नुकत्याच झालेल्‍या परिषदेत डॉ. महेश मालू यांनी आयोजन समिती सचिवपदाची जबाबदारी सांभाळताना सांघिक परिश्रमातून परिषद यशस्‍वी करून दाखविली.

यापूर्वी नाशिक सर्जिकल सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. मालू यांच्‍याकडे असताना २०१९ मध्ये नाशिक शाखेला बेस्‍ट ॲकॅडमिक पुरस्‍कार मिळाला होता. त्‍यामुळे त्‍यांना संघटन नेतृत्वाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

dr mahesh malu
Nashik MHADA News: अधिकारी उपलब्ध नसल्याने बैठक पुढे ढकलली! मार्चमध्ये होणार म्हाडा अधिकाऱ्यांची बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.