Dr. Neelam Gorhe : नाशिक प्रगत जिल्हा आहे, मात्र येथील मुलींच्या जन्मदराबाबत समाधानकारक स्थिती दिसत नाही. प्रति हजार ९३१ हा दर कमी आहे, त्यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी (ता. १९) येथे व्यक्त केली. (Dr Neelam Gorhe statement Increase the fertility of girls in advanced Nashik)
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा नाशिक प्रकल्प अधिकारी जितीन रहेमान, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की आनंदाचा शिधा वेळेत वितरित केला जावा, कुपोषित मुलांकडे लक्ष द्यावे, जिल्हा परिषद शाळेत दिव्यांग मुलांचे सक्षमीकरण करण्याबाबत प्रयत्न करावेत, आनंदाचा शिधा वितरणावर लक्ष दिले जावे, तसेच लिंग निदान चाचण्यांचे केंद्र सुरू आहे का, बाहेरील भागात जाऊन चाचण्या होतात का, यावर लक्ष द्यावे, प्रगत तालुक्यांत मुलींचा जन्मदर कमी आहे.
नाशिकला मुलींचा जन्मदर घटत असल्याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे.
स्थलांतरितांचे ट्रॅकिंग
राज्यात आदिवासी भागातील मुलांचे स्थलांतर होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या आदिवासी मुलांचे ट्रॅकिंग झाले पाहिजे. नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय आहे, तेथे आढावा बैठक घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.