Swatantrya Veer Savarkar Virta Puraskar : सावरकर ध्यासाचा, ध्येयाचा विषय : डॉ. नीरज देव

Veer Savarkar
Veer Savarkaresakal
Updated on

Nashik News : स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्त आणि हुतात्मे होते. सावरकरांच्या विचार व वर्तनावर टीका टिपणी सातत्याने होत आहे.

परंतु त्यांनी कुटुंबाचा त्याग करून देशभक्ती रुजविली, स्वातंत्र्यवीर सावरकर कुटुंब त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

सावरकर ध्यासाचा, ध्येयाचा विषय आहे, हा पुरस्काराचा विषय होईल असे वाटले नाही, असे मत डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले. (Dr Neeraj Deo Say Savarkar is subject of obsession a goal dr neeraj deo get Head of Tourism Department Savarkar Virta Award announced Nashik News)

Veer Savarkar
Nashik News : पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीत आमदारांचा तक्रारींचा पाऊस, जलजीवनच्या कामांची होणार पडताळणी

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधत, राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी साप्ताहिक विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, पहिला स्वा. सावरकर वीरता पुरस्कार डॉ. नीरज देव यांना जाहीर झाला आहे.

स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह २१ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्रातल्या पाच मुख्य शहरात होत आहे. याच कालावधीत स्वा. सावरकर वीरता पुरस्कारही दिले जाणार आहेत. या वर्षापासून हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळा लोकमान्य सेवा संघ, पारले (मुंबई) येथे गुरुवारी (ता.२५) सायंकाळी सहाला होणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या पुरस्कारासाठी व्यक्तींची/संस्थांची निवड करण्यासाठी सहा सदस्यीय पुरस्कार निवड समिती स्थापन करण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Veer Savarkar
Jalgaon News : तिसऱ्या वर्षापासूनच तबल्याच्या साधनेचा यज्ञ! चिमुरड्या यज्ञेशची तपस्या

ज्येष्ठ सावरकर विचार अभ्यासक तथा माजी खासदार प्रदीप रावत (पुणे), लेखक आशुतोष अडोणी (नागपूर), युवा सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर, सिर्फ या संस्थेच्या संस्थापिका सुमेधा चिथडे (पुणे), प्रा. सचिन कानिटकर (सांगली), साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर (मुंबई) हे या निवड समितीचे सदस्य होते.

यांना दिला जाणार पुरस्कार
नक्षलग्रस्त भागात काम करणारे जनसंघर्ष समितीचे संस्थापक दत्ताजी शिर्के, लव्ह जिहाद या विषयात जनजागृती करणाऱ्या मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी, सावरकर साहित्य-विचारांचे सखोल अभ्यासक व प्रबोधनपर लेखन करणारे जळगाव येथील डॉ. नीरज देव, स्वत:ची जमीन देऊन आणि स्वा. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ही सैनिकी शाळा सुरू केलेले सोलापूर जिल्ह्यातील आबासाहेब कांबळे आणि भारतीय नागरिक म्हणून स्वहक्कांबद्दल जागरूक राहून लढा देणाऱ्या मुंबईच्या अभिनेत्री गार्गी त्रिपाठी या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व २१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Veer Savarkar
Pune News : राजकीय दाबावतंत्राचा पुणेकरांना फटका; पावसाळ्याच्या तोंडावर १११ कोटींची रस्त्याची कामे

"वीर सावरकरांच्या देशभक्तिवर आक्षेप घेणे मूलतः चुकीचे आहे. स्वतंत्र्य भारतात वीर सावरकरांवर फुले उधळली जावीत. परंतु, सावरकरांच्या नावे राजकारण करून द्वेष पसरविला जात आहे. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे पहिला स्वा. सावरकर वीरता पुरस्कार मिळत असल्याचा आनंद आहे."
-डॉ. नीरज देव, लेखक

Veer Savarkar
Nashik News : पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीत आमदारांचा तक्रारींचा पाऊस, जलजीवनच्या कामांची होणार पडताळणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()