Malaria Disease : नाशिक विभाग राज्यात ‘मलेरिया’ कमी करण्यात अव्वल : डॉ. पी. डी. गांडाळ

Malaria Spray
Malaria Sprayesakal
Updated on

Malaria Disease : केंद्र शासनाने २०३० पर्यंतचे हिवताप दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात नाशिक आरोग्य विभागाला यश आले आहे. यावर्षी ६ लाख रक्त नमुने तपासणीत अजून एकही हिवताप रुग्ण आढळलेला नाही.

त्यामुळे हिवताप दुरीकरणासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे जनतेच्या सक्रिय सहभागातून हे शक्य होणार आहे. (Dr P D Gandal Nashik division tops in reducing malaria in state nashik news)

आरोग्य सेवा विभाग (हिवताप) चे सहसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी सांगितले, की नाशिक विभागात ५ जिल्हे व ५ मनपा असल्याने लोकसंख्या पण तुलनेने जास्त आहे. तसेच आदिवासी भाग पण जास्त असल्याने मजूर स्थलांतर करतात.

तसेच विभागात साखर कारखाने असल्याने इतर जिल्ह्यातील मजूर ही मोठ्या प्रमाणात आपल्या विभागातीलच नाशिक, नगर, जळगाव या मोठ्या लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात येतात. मध्य प्रदेश, गुजरात राज्य सीमा आणि ठाणे, पुणे, औरंगाबाद विभागाच्या सीमा असूनही मलेरिया या महसूल विभागांच्या तुलनेत नाशिक विभागात नियंत्रणात आहे.

नाशिक विभागातील मनपा (नाशिक), मनमाड, मनपा (जळगाव), भुसावळ व मनपा (अहमदनगर) येथील ५ जीवशास्त्रज्ञ (बायोलॉजिस्ट) पदे रिक्त असून अतिरिक्त पदभार देत काम चालू आहे. आरोग्य कर्मचारी यांची भर्ती न झाल्याने अनेक पदे रिक्त असूनही लोक अतिरिक्त काम करीत आहेत.

नाशिक विभागात हिवताप विभागाचे दुरीकरणासाठी वाटचाल असून विभागातील सर्व जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सक्रिय सहभागामुळे व उपसंचालक (आरोग्य सेवा) यांच्या मार्गदर्शनाने शक्य झाले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Malaria Spray
Swachh Bharat Abhiyan: स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा; दुभाजकांमध्ये अस्वच्छता, निधी खर्चास मिळेना मुहूर्त

यावर्षी विभागात पहिल्या तिमाहीत सुमारे ६ लाख रक्त नमुने हिवताप आजारासाठी तपासून देखील जानेवारी ते आजअखेर विभागात अद्याप एकही हिवतापाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच स्थलांतरित मजूर वर्ग, अतिजोखमींची गावे याकडे आरोग्ययंत्रणांनी जनतेचा सहभाग घेत जनजागृती व नियमित सर्वेक्षण करत विशेष लक्ष दिले जात असल्याचे डॉ. गांडाळ यांनी सांगितले.

विभागनिहाय हिवताप रुग्ण आकडेवारी

नागपूर विभाग-७२८
ठाणे विभाग-३६१
अकोला विभाग-०६
नागपूर-०२
कोल्हापूर-०२
पुणे विभाग-०२
औरंगाबाद विभाग-०१
लातूर विभाग-०१
नाशिक विभाग-००

Malaria Spray
SAKAL Impact : 3 टँकरद्वारे पाथर्डी भागात पाणीपुरवठा! पाइपलाइनसाठी पुन्हा मोजमाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.