Onion Export Ban: निर्यातबंदीचा फेरविचार करावा; डॉ. पवार यांचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र

Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawaresakal
Updated on

Onion Export Ban: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि जनजाती राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत त्यांना निर्यातबंदीबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

याबाबतचे पत्रही त्यांना दिल्याची माहिती मंत्री डॉ. पवार यांनी दिली. (Dr Pawar letter to Union Commerce Minister Piyush Goyal on onion ban decision nashik news)

केंद्रीय आदिवासी जनजाती राज्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर डॉ. पवार यांचे शनिवारी (ता. ९) नाशिक येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की मी शेतकऱ्यांबरोबर आहे.

याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. निवडणुकीचा आणि या निर्यातबंदीचा संबंध नाही, असे म्हणत त्यांनी निवडणुका आल्यावर कांद्याचा प्रश्न उभा राहतो, हा आरोप फेटाळला.

Dr Bharti Pawar
Onion Export Ban: पिंपळगावला लिलाव पूर्ववत, मात्र दर दीड हजाराने घसरले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कांदा प्रश्नावर चांदवड येथे आंदोलन करणार आहेत. याबाबत विचारणा केली असता, डॉ. पवार यांनी याबाबत राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धोरण सर्वांनी अवलंबले पाहिजे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, मनोज बेलदार, प्रवीण रौंदळ, सुनील बच्छाव, नितीन गायकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सावरकरनगर येथील निवासस्थानाच्या रस्त्यावर रांगोळी, फटाके तसेच आदिवासी वाद्यांसह मंत्री डॉ. पवार यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

Dr Bharti Pawar
Onion Export Ban: निर्यातबंदीने कांद्याचे दर कमी होणार? ग्राहकांना फायदा नाहीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.