Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकची ऑलिंपिक स्पर्धा : डॉ.प्रवीण गेडाम

Latest Nashik News : विविध सामाजिक, व्यावसायिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्पना स्वागताहार्य असून, ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे आगामी कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी केले.
Speaking in a meeting on the occasion of Simhastha Kumbh Mela, Divisional Commissioner Pravin Gedam,
Speaking in a meeting on the occasion of Simhastha Kumbh Mela, Divisional Commissioner Pravin Gedam,esakal
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रत्येकी बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करताना व्हीजन डोळ्यासमोर ठेवून शहरांचा शाश्‍वत विकास करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी विविध सामाजिक, व्यावसायिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्पना स्वागताहार्य असून, ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे आगामी कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी केले. (Simhastha Kumbh Mela Olympic competition of Nashik)

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको), आर्किटेक्चर असोसिएशन ऑफ नाशिक, क्रेडाई आदी संघटनांनी एकत्रितपणे बुधवारी (ता.२) वैराज कलादालन येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ याविषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. व्यासपीठावर महापालिका आयुक्त अशोक करंजकर, ‘एनएमआरडीए’च्या आयुक्त मनिषा खत्री, क्वालिटी सिटी ऑफ नाशिकचे प्रवर्तक जितूभाई ठक्कर, ‘नरेडको’चे अध्यक्ष सुनील गवादे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, शासकीय स्तरावरील कामे तुकड्या-तुकड्यांनी होतात. त्यामुळे कामांमध्ये सुसूत्रता राहत नाही आणि कालांतराने ही कामी कालबाह्य ठरतात. कुंभमेळ्याच्यादृष्टीने होणारी कामे ही दीर्घकालीन उपयोगी कशी ठरतील यादृष्टीने आत्तापासूनच विचार करावा लागेल. बृहत् आराखडा तयार करताना कुंभमेळ्याशी निगडित नसलेल्या परंतु, त्यात ऐनवेळी समाविष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टींचाही समावेश करावा.

जेणेकरून ऐनवेळी प्रस्ताव मागवल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया करण्यापेक्षा आत्तापासूनच त्याची तयारी ठेवली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. शहरातील नागरिकांच्या सूचनांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वास्तुविशारदांनी सुंदर ‘डिझाईन’ तयार केल्यास नाशिक शहरही लंडन सारखे निश्‍चितपणे परिपूर्ण शहर होईल, असा विश्‍वास डॉ.गेडाम यांनी व्यक्त केला. जितूभाई ठक्कर, क्रुणाल पाटील यांनी नाशिकच्या विकासासाठी आम्ही सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सुनील गवादे यांनी प्रास्ताविक केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सूचना मांडल्या. (latest marathi news)

Speaking in a meeting on the occasion of Simhastha Kumbh Mela, Divisional Commissioner Pravin Gedam,
Nashik Crime : तक्रारदारास चापट मारणारा भद्रकाली ठाणे अंमलदार निलंबित! आयुक्तांचा दणका; तक्रारदारांशी सौजन्यानेच वागा

नाशिककरांच्या सूचना

- २०१५च्या कुंभमेळ्यातील अपूर्ण कामे पहिल्यांदा पूर्ण करा

- गोदावरी नदीत मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त करा

- ‘स्मार्ट सिटी’ला कुंभमेळ्याच्या कामांत स्थान देवू नका

- टायरबेस निओ मेट्रो नको तर, नाशिकला मेट्रो रेल्वेच द्या

- रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बस स्थानकांना जोडणारा रेल्वे प्रकल्प हवा

- मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा

- विनाकारण बसवण्यात आलेले गतिरोधक काढा

- बेघर लोकांची व्यवस्था करा

- ‘द्वारका’सर्कलची वाहतूक कोंडी सोडवा

- बॉटनिकल गार्डन, फाळके स्मारकांचा विकास करा

- पाण्यामुळे साथीचे आजार होणार नाही याची काळजी घ्यावी

- ‘करोना’च्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सुविधांचा विचार व्हावा

- गंगेवरील वस्त्रांतर गृह हटवा

- ‘स्कॅन ॲण्ड सजेस्ट’ या धर्तीवर सर्व सूचनांचा स्वीकार करा

Speaking in a meeting on the occasion of Simhastha Kumbh Mela, Divisional Commissioner Pravin Gedam,
Office Toxic Management : वर्क लोडमुळे करून घेऊ नका मेंदूचा कचरा, असे करा ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणाशी दोन हात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.