Nashik News: चांदवड-देवळा मतदारसंघामधील विकासकामांसाठी 192 कोटी मंजूर : डॉ. राहुल आहेर

Dr. Rahul Aher
Dr. Rahul Aheresakal
Updated on

चांदवड : नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसाठी १९२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ही माहिती दिली. (Dr Rahul aher statement 192 crore approved for development works in Chandwad Devla Constituency Nashik News)

डॉ. आहेर म्हणाले, की प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्यमार्गासह इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी ५१ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

चांदवड आणि देवळा तालुक्यातील सहा तलाठी आणि सहा मंडलाधिकारी यांच्या कार्यालयांच्या बांधकामासाठी एक कोटी ८० लाख रुपयांना मान्यता मिळाली.

आदिवासी विभागाच्या अंतर्गत मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी ११२ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले असून, ‘नाबार्ड'च्या अंतर्गत धोडंबे आणि उशीरवाडी येथील रस्त्यांसाठी ३ कोटी ३८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Dr. Rahul Aher
Nashik News: मध्य रेल्वेतर्फे 33 कोटींची भंगार विक्री! मनमाडसह मुंबईतील स्थानकांचा समावेश

विकासकामांचा निधी लवकर संबंधित विभागांकडे वर्ग होऊन विकासकामे मार्गी लागतील.

कामनिहाय मंजूर झालेला निधी (आकडे रुपयांमध्ये दर्शवितात)

० चांदवड तालुक्यातील ट्रॉमा केअर रुग्णालयासाठी-३ कोटी ३७ लाख

० देवपूरपाडे (ता. देवळा) येथील आश्रमशाळेच्या इमारतीसाठी- १३ कोटी ४० लाख

० पारेगाव (ता. चांदवड) येथील आश्रमशाळेच्या इमारतीसाठी- ६ कोटी ४४ लाख

Dr. Rahul Aher
Nashik: होर्डिंग्स लावून ‘भाईगिरी’ करणाऱ्यांना लावणार ‘मोक्का’! 'बर्थ-डे भाई' विरोधात गुन्हा; पोलीस आयुक्तांचा दणका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.