Nashik News : महापालिकेचे वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक करणार स्वतःवरील आरोपांची सखोल चौकशी; महापालिकेचा अजब निर्णय

Municipal Medical Superintendent Dr. Rajendra Bhandari
Municipal Medical Superintendent Dr. Rajendra Bhandariesakal
Updated on

Nashik News : महापालिकेचे वादग्रस्त डॉ. राजेंद्र भंडारी यांची वैद्यकीय अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर तेच त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आयुक्तांची परवानगी न घेता परदेशातील प्रवास व नाशिक रोडच्या त्यांच्याच मालकीच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी यंत्र सापडल्याच्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत असून, नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Dr Rajendra Bhandari Municipal Medical Superintendent will investigate allegations against him nashik news)

महापालिका क्षेत्रात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कारवाईची जबाबदारी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असताना महापालिकेचेच वैद्यकीय अधिकारी व तत्कालीन बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन आढळले.

नाशिक रोड येथील देवळाली गाव परिसरात श्री. बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत अनधिकृत सोनोग्राफी मशिन आढळले होते. सदरचे रुग्णालयाची इमारत डॉ. भंडारी यांच्या मालकीची असल्याची बाब समोर आली. महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशिनसह रुग्णालय सील केले होते.

त्यानंतर या प्रकरणात डॉ. भंडारी दांपत्यासह नऊ डॉक्टरांसह ११ जणांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नाशिक रोड न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय विभागाने डॉ. भंडारी हे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रशासन उपायुक्तांकडे दाखल केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Municipal Medical Superintendent Dr. Rajendra Bhandari
Medical Admission: वैद्यकीयच्या प्रवेशासाठी नोंदणी आजपासून; सविस्‍तर वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम

डॉ. भंडारी यांच्या कृतीमुळे नागरिकांमध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन करणे, पालिकेच्या सेवेत असतानाही खासगी व्यवसाय करणे आणि अवैधरीत्या सोनोग्राफी मशिन बाळगणे, असे तीन आरोप त्यांच्यावर ठेवले होते. या प्रकरणी चौकशी प्रलंबित असतानाच डॉ. भंडारी यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार सोपविल्याने तेच त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्यान अधीक्षक नियुक्ती वादात

महापालिकेच्या उद्यान विभागासाठी वन विभागाकडून विवेक भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत उद्यान उपायुक्त व अधीक्षक अशी दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे दिली जातात.

अन्य विभागांच्या बाबतीतही हेच धोरण असताना भदाणे यांच्याऐवजी त्यांचा विभाग उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने प्रशासकीय पदभार देण्यासंदर्भात नवा वाद निर्माण झाला आहे. वृक्षगणना तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण, उद्यान देखभाल व दुरुस्तीच्या कामे देण्याच्या पार्श्वभूमीवर बदल झाल्याची चर्चा आहे.

Municipal Medical Superintendent Dr. Rajendra Bhandari
Nashik News : महापालिकेच्या वैद्यकीय अधिक्षक पदावर अवैधरीत्या सोनोग्राफी मशिन सापडलेल्या डॉक्टरची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.